सकाळ वृत्तसेवा
२४ जुन २०१०
तळकट, भारत
कुंब्रल येथील एका अंधाने ऍक्युप्रेशर व मसाज पद्धतीने रुग्णसेवा सुरू केली आहे. स्वावलंबी होण्याबरोबरच रुग्णसेवेचा आनंद ते यातून घेत आहेत. कुंब्रलमधील विनायक शांताराम देसाई पूर्णपणे अंध असून, ते उत्तम प्रकारे ऍक्युप्रेशर व मसाज पद्धतीचा रुग्णांसाठी वापर करून आपला उदरनिर्वाह चालवितात. नॅब पुनर्वसन विभाग मुंबई यांच्याकडे त्यांनी यासाठीचे प्रशिक्षण घेतले. विनायक रुग्णांना पॅरालेसीस, सांधेदुखी, संधिवात, मणक्याचे आजार, डोकेदुखी, अर्धशिशी, ऍसिडिटी व डायबेटीस या शारीरिक आजारांवर उपचार देतात. सध्या डॉक्टर निनाद पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली ते प्रात्यक्षिक करीत आहेत. ऑन कॉल घरी येऊन सेवा देण्याची त्यांची तयारी आहे. त्यांनी दिलेला हा स्वावलंबन, रोजगाराचा पाठ डोळस बेरोजगारांना धडा देणारा आहे.
अंध करतोय रुग्णांची सेवा
- Details
- Hits: 3787
0