म. टा. वृत्तसेवा
२१ जुलै २००९
पुणे, महाराष्ट्र
आणखी तीन मुलांना लागण
पुण्यात आणखी तीन शाळकरी मुलांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून त्यामध्ये अभिनव विद्यालयातील आठवीतील दोन आणि पाचवीतील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. त्यामुळे नायडू हॉस्पिटलमधील दाखल स्वाइन फ्लू झालेल्या शाळकरी मुलांचा आकडा १३ झाला आहे.
स्वाइन फ्लू झालेले १० विद्याथीर् आधी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते. रविवारी सकाळी तिथे १० शाळकरी मुले संशयित पेशंट म्हणून दाखल झाली. सोमवारी त्यांचा रिपोर्ट आला असता त्यातील तीनजणांना स्वाइन फ्लू झाला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. आर. आर. परदेशी यांनी दिली. पालकांमध्ये घबराट पसरली असून असे पेशंट आढळल्यानंतर आठ दिवस शाळा बंद ठेवण्याबाबत अभिनव विद्यालय प्रशासनाने उदासीनता दाखवल्याचा आरोप करून भा.वि. सेनेच्या कार्यर्कत्यांनी आदर्श शिक्षण मंडळाचे सचिव चिंतामणी लाटकर यांना घेराव घातला. शाळा बंद ठेवण्याची मागणीही त्यांनी केली. त्यावर, 'अभिनव विद्यालयाच्या एकाच कॅम्पसमध्ये इंग्रजी-मराठी माध्यमाच्या शाळा आहेत. इंग्रजी माध्यमाचा एक वर्ग वगळता अन्य कुठेही त्याची लागण झालेली नाही. आरोग्य विभागाकडून येणाऱ्या सर्व सूचनांचे शाळा पालन करत आहे', असे लाटकर यांनी स्पष्ट केले. स्वाइन फ्लूबाबत कोणती काळजी घ्यावी, यासाठी मंगळवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सभा आहे.
१३ विद्यार्थ्यांना स्वाइन फ्लू
- Details
- Hits: 3673
0