म टा वृत्तसेवा
२७ जुलै २००९
पुणे, महाराष्ट्र
सुधीर साबळे
स्वाइन फ्लूच्या पेशंट्सवर उपचार करण्यासाठी केंद सरकारने २० हजार 'टॅमिफ्लू'च्या गोळ्या राज्य सरकारला उपलब्ध करून दिल्या आहेत. स्वाइन फ्लूच्या औषधांचा साठा भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्याने नागरिकांनी विनाकारण घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, असे सरकारचे म्हणणे आहे.
राज्यात आतापर्यंत ६५ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून त्यापैकी ४७ जण पुण्यातले आहेत. त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. सध्याच्या घटकेला नायडू हॉस्पिटलमध्ये स्वाइन फ्लूचे पेशंट उपचार घेत असून तेथे दररोज टॅमिफ्लूच्या ५० गोळ्या खचीर् पडत आहेत. टॅमिफ्लूची गोळी प्रभावी असून दोन ते तीन दिवसांमध्ये स्वाइन फ्लूचा संसर्ग कमी होतो. या गोळ्यांची निमिर्ती भारतातच करण्यात आली असून त्याचा पुरवठा फक्त सरकारला करण्यात येत आहे. राज्यातल्या स्वाइन फ्लूच्या परिस्थितीवर केंद सरकारच्या आरोग्य विभागाचे लक्ष असून वेळ पडल्यास औषधाच्या पुरवठ्यामध्ये वाढ करण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
पूवीर् स्वाइन फ्लूची लागण झालेला पेशंट ठीक झाला की डिस्चार्ज देण्यापूवीर् त्याच्या थ्रोट स्वॅपचा नमुना पुन्हा एकदा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठवला जायचा. मात्र, आता स्वाइन फ्लूचा पेशंट बरा झाला की डिस्चार्ज देताना त्याच्या थ्रोट स्वॅपची पुन्हा तपासणी करण्याची आवश्यकता नसल्याचा अध्यादेश केंद सरकारच्या आरोग्य विभागाने आठ दिवसांपूवीर् काढला आहे. स्वाइन फ्लूच्या पेशंट्सवर सरकारी यंत्रणेचे नियंत्रण असल्याने नायडू हॉस्पिटलमध्ये ४०, तर वायसीएमए आणि औंध हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी २० बेडची सुविधा उपलब्ध असून सध्याच्या स्थितीत ती पुरेशी आहे. अशा पेशंट्ससाठी खासगी हॉस्पिटलांत सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात आरोग्य विभाग कोणताही विचार करत नसल्याचे ते म्हणाले.
आणखी सहा पेशंट
पुण्यात रविवारी स्वाइन फ्लूचे आणखी सहा पेशंट सापडले. न्यू इंडिया स्कूलमध्ये नवव्या आणि दहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या दोनजणांना तर सिंबायोसिसमध्ये सहावी आणि पहिलीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. दोन विद्यार्थ्यांना स्वाइन फ्लूची लागण झाली असली तरी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे न्यू इंडिया स्कूल बंद ठेवण्यात येणार नसल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी पिराजी पाटील यांनी सांगितले.
स्वाइन फ्लू? घाबरू नका!
- Details
- Hits: 3242
0