म.ट.वृत्तसेवा
०६ ऑगस्ट २००९
न्युयॉर्क, USA
जगभरात स्वाइन फ्लूने हाहाकार माजवल्याने जागतिक आरोग्य संघटनेने याची गंभीर दखल घेतली असून स्वाइन फ्लूची पहिली लस सप्टेंबरमध्ये सगळ्या देशासाठी उपलब्ध होणार असे जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच जाहिर केले आहे.
यापूर्वीच प्रायोगिक तत्वावर ही लस तयार केली गेली आहे. या लसीचे अनेक प्रयोगदेखील झालेले आहेत. ही लस जुन्या , यशस्वी प्रयत्नांद्वारे केली असून , सगळ्यांसाठी सुरक्षित आहे असा निर्वाळा जागतिक आरोग्य संघटनेनी दिला आहे.
ही लस तयार झाल्यानंतर सर्वप्रथम लहान मुले आणि गरोदर स्त्रियांसाठी उपलब्ध होणार आहे.जुन्या आणि नव्या तंत्रज्ञानाची जोड देऊन ही लस तयार केलेली आहे.
बॅक्स्टर नावाच्या औषध कंपनीद्वारे ती सेल्वापेन या नावाने बाजारात आणली जाईल. दरम्यान, स्वाइन फ्लूवर नियंत्रण आणण्यासाठी आयुर्वेदीक औषध शोधण्यात येईल असे पुण्यात जाहीर करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला परम कम्प्युटरचे जनक विजय भटकरही उपस्थित होते.
स्वाइन फ्लूची लस सप्टेंबरमध्ये
- Details
- Hits: 3322
0