Print
Hits: 3247

टाइम्स टीम
२५ जुलै २००९
नाशिक, महाराष्ट्र

सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात उच्चतम आणि 'स्टेट ऑफ आर्ट' दर्जाच्या आरोग्यसुविधा उपलब्ध करून देणाऱ्या 'श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर'मध्ये सरकारची जीवनदायी योजना लागू करणार असल्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मान्य केले आहे.

या हॉस्पिटलचे उद्घाटन बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री छगन भुजबळ तसेच आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. अत्याधुनिक सुविधांमुळे तर हे हॉस्पिटल हृदयरुग्णांसाठी जीवनदायी ठरणार आहेच. पण, जीवनदायी योजनेमुळे गरिबांनाही इथे उपचार घेता येणार आहेत. वाषिर्क उत्पन्न २० हजार रुपये असलेल्यांना हृदय शस्त्रक्रिया आणि अन्य गंभीर आजारांवरील उपचारांसाठी सरकारतर्फे दीड ते अडीच लाख रुपयांची मदत जीवनदायी योजनेअंतर्गत केली जाते.

डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी आणि डॉ. पल्लवी धर्माधिकारी यांच्या अथक परिश्रमांतून साकारलेल्या श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरच्या रुपाने केवळ नाशिकच नव्हे तर अवघ्या उत्तर महाराष्ट्राला उच्च वैद्यकिय कौशल्य आणि अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने सज्ज असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉस्पिटल उपलब्ध होणार आहे. श्री साईबाबा संस्थानच्या शिडीर् येथील सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो हृदयरुग्णांवर सेवाभावी वृत्तीने उपचार करणाऱ्या डॉ. धर्माधिकारी यांनी इथेही तिच भूमिका ठेवण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.

स्वत: सत्यसाईबाबांचे भक्त असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, 'याबाबत काही मंडळी टिंगल करतात. मात्र, आशिर्वादांचे मूल्य मोठे असते. आशिर्वादाशिवाय मोठे काम उभे राहत नाही. या हॉस्पिटललाही साईबाबांचे आशिर्वाद लाभले आहेत. याठिकाणी गरिबांना विनामूल्य उपचार मिळावेत.' तर उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी 'नाशिकचा सर्वच क्षेत्रात विस्तार होतो आहे. मात्र. त्याजोडीने प्रदूषण आणि आरोग्याच्या समस्याही वाढत आहेत. अशावेळी डॉ. धर्माधिकारी दांपत्याने अत्यंत चांगली अशी सोय उपलब्ध करून दिली आहे. आता नाशिककरांना हृदयोपचारांसाठी मुंबई-पुण्याला जावं लागण्याची गरज भासू नये.' डॉ. शोभा बच्छाव यांनाही डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या सामाजिक बांधिलकीचा गौरव यावेळी केला. डॉ. धर्माधिकारी यांनी आकाशवाणीवर दिलेल्या भाषणांचे संकलन असलेल्या सीडीचं प्रकाशनाही या समारंभात करण्यात आलं.

हृदयरोगाशी संबंधित लहानसहान तक्रारींपासून अत्यंत गुंतागुंतीच्या केसेसपर्यंत सर्वच रुग्णांवर प्रभावीपणे उपचार करता यावेत, या उद्देश्याने हे हॉस्पिटल उभारण्यात आलेले आहे. अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि तऱ्हतऱ्हेच्या हृदयशस्त्रक्रियांसाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक कॅथ लॅब या हॉस्पिटलमध्ये तयार करण्यात आली आहे. केवळ औषधोपचारच नव्हे तर त्यापलिकडे जाऊन हृदयरुग्णांच्या आरोग्याची काळजी इथे घेतली जाणार आहे. नाशिक शहराच्या अत्यंत मध्यवतीर् पण शांत अशा परिसरात कालिदास कलामंदिराशेजारी हे ५० बेडचे अद्ययावत हॉस्पिटल वास्तुविशारद रोहित फेगडे आणि प्रसन्ना भोरे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आले आहे. श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरतर्फे हृदयरुग्णांसाठी खास सज्जता असलेली काडिर्याक रुग्णवाहिका, मेडीकल स्टोअर आणि रेडीओलॉजी तसेच पॅथॉलॉजी लॅब या सुविधा २४ तास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

एक खास काडिर्याक पुनर्वसन केंद हीदेखील या हॉस्पिटलची खासियत आहे. ज्याद्वारे हृदयरुग्णांना त्यांचे आयुष्य पुवीर्इतक्याच सक्षमतेने जगता यावे, म्हणून मार्गदर्शन केले जाईल. हृदयशस्त्रक्रिया झाल्यावर घ्यावयाची काळजी, आहार नियंत्रण, फिजीओथेरेपी, योगाभ्यास आणि व्यायाम याबाबत रुग्णांना शिक्षित करण्यासाठी जबाबदारी डॉ. विजय गवळी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. डॉ. गवळी यांनी हृदयरुग्णांसाठी उपकारक ठरेल अशा योगाभ्यासाची विशेष रचना संशोधित केलेली असून तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेली आहे. या हॉस्पिटलतर्फे सगळ्यांनाच लाभदायी ठरतील अशा विशेष आरोग्य तपासणी योजना अर्थात हेल्थ चेक-अप प्लॅनही तयार करण्यात आले आहेत.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.