महाराष्ट्र टाईम्स
- म. टा. व्यापार प्रतिनिधी
वाढत्या महागाईबरोबरच वैद्यकीय विमा अर्थात मेडिकल इन्शुरन्स पॉलिसीज महागत चालल्या आहेत. आताच्या काळात सर्वांसाठीच 'मेडिकल इन्शुरन्स' हे अत्यावश्यक बनत चालले आहे आणि भविष्यात अधिकाधिक बनणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना (ज्यांना 'सीनियर सिटिझन्स' म्हटले जाते) ज्या संख्येने इस्पितळांमध्ये दाखल केले जात आहे ते पाहून विमा कंपन्यांनी आपल्याला होणारा तोटा टाळण्यासाठी आपापल्या मेडिकल इन्शुरन्स पॉलिसीजवरील 'प्रिमियम' विमा रकमेच्या ('सम अॅश्युअर्ड') बऱ्याच टक्क्यांनी वाढविला आहे.
उदाहरणार्थ, २५ वषेर् वयाच्या तरुण व्यक्तीला 'सम अॅश्युअर्ड'च्या १.५ टक्का इतका हप्ता अर्थात 'प्रिमियम' द्यावा लागत असेल तर ६० वषेर् वयाच्या व्यक्तीला तितक्याच 'सम अॅश्युअर्ड'वर तब्बल ८ टक्के, इतका 'प्रिमियम' भरावा लागेल. 'इन्शुअरर' म्हणजेच विमा कंपनी जोखमींच्या दोन घटकांचा विचार करून आपल्या मेडिकल इन्शुरन्स पॉलिसीची किंमत अर्थात 'प्रिमियम' निश्चित करते. एक, विमाधारक व्यक्तीला किती काळ हॉस्पिटलमध्ये रहावे लागेल. दोन, ज्या आजारामुळे त्याला हॉस्पिटलात दाखल करावे लागले आहे त्यामुळे त्याचे काय, किती नुकसान होणार आहे. 'ऑप्टिमा इन्शुरन्स ब्रोकर्स' आणि 'क्लिकटूइन्शुअर डॉट कॉम'चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल अग्गरवाल म्हणतात: दोन्ही जोखमी ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत समान आणि अधिक असतात. उदाहरणार्थ, एखाद्या सीनियर सिटिझनला ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर बराच काळ हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागेल, मग त्याची शस्त्रक्रिया करावी लागो वा न लागो. मोठा खर्च हा होणारच. वस्तुस्थिती अशी आहे की, 'मेडिक्लेम' पॉलिसींवरील 'प्रिमियम' बराच वाढलेला असला तरी सीनियर अत्यावश्यकच ठरते, कारण पॉलिसी नसेल तर इस्पितळातील उपचारांवर होणारा भरमसाठ खर्च त्यांची सर्व बचत धुवून काढील. तात्पर्य, मेडिकल इन्शुरन्स पॉलिसीला पर्याय नाहीच.
सरकारी व खासगी क्षेत्रातील अनेक विमा कंपन्या सध्या सीनियर सिटिझन्सना विविध प्रकारच्या आरोग्य विमा योजना विकत आहेत. नॅशनल इन्शुरन्स कंपनी ६० ते ८० वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विमा योजना विकत असून, ९० व्या वर्षापर्यंत या पॉलिसीचे नूतनीकरण करता येते. वयानुसार या पॉलिसीवरील 'प्रिमियम' अधिक असून, ६० ते ६५ वयोगटासाठी वाषिर्क 'प्रिमियम' ४,१८० रु. असून, तो ७६ ते ८० वर्षापर्यंत ६,८९० रुपयांपर्यंत वाढत जातो. पण 'नॅशनल इन्शुरन्स' फक्त एक लाख रु.पर्यंतच विमा संरक्षण देते, तर 'युनायटेड इंडिया' तीन लाखांपर्यंत. बजाज अलियान्झ पाच लाख रु. पर्यंत, तर 'स्टार हेल्थ' दोन लाखांपर्यंत. विविध कंपन्यांच्या वैद्यकीय विमा योजनांचे स्वरूप आणि 'प्रिमियम'ची रक्कम वेगवेगळी आहे.
एखाद्या विमा कंपनीचा 'प्रिमियम' कमी आहे एवढेच पॉलिसी घेताना पाहून चालणार नाही, तर तिची 'क्लेम सेटलमेंट हिस्टरी' पाहणे व मगच निर्णय घेणे योग्य ठरेल, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
मेडिकल इन्शुरन्सला पर्याय नाहीच
- Details
- Hits: 7539
9