महाराष्ट्र टाइम्स
०२ नोव्हेंबर २००९
बेकायदा गर्भलिंग चाचणी केल्याबद्दल दोन डॉक्टर्सना प्रत्येकी तीन वषेर् तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
दादर येथील शिंदेवाडी कोर्टाचे दंडाधिकारी आय. व्ही. जांबकर यांनी, होमियोपाथी डॉक्टर छाया तातेड आणि औरंगाबादहून येणाऱ्या शुभांगी आडकर यांना, संबंधित कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही शिक्षा जाहीर केली आहे.
दादर येथील श्री मॅटनिर्टी होममध्ये या दोघी प्रॅक्टिस करत होत्या. एका साप्ताहिकात त्यांनी, मुलगा हवा असल्यास विशेष उपचार केले जातील अशी जाहिरात दिली होती.
या जाहिरातीबाबत मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांनी तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन कोर्टाने हा निर्णय दिला. याबाबत करण्यात आलेल्या कायद्यात, प्रसुतीपूर्व गर्भलिंग चाचणीला बंदी घालण्यात आली आहे. अशी चाचणी करून, मुलगी जन्माला येणार असल्यास माता गर्भपात करून घेतात. यामुळे अनेक राज्यांत. पुरू षांपेक्षा महिलांची संख्या कमी होऊ लागली आहे.
कोर्टाने, या दोघींना प्रत्येकी तीस हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या गर्भलिंग चाचणीला संबंधित यंत्रणेने मान्यता दिली नव्हती. तसेच या केंदाबाहेर अशा चाचणीवर बंदी असल्याचा कोणताही फलक नव्हता असेही आढळले.
तातेड यांनी असा बचाव केला की, जाहिरातीत मी मुलगा होत नाही असे शब्द वापरायला सांगितले नव्हते तर मुल होत नसेल तर असे शब्द वापरावेत असे टेलिफोनवरून सांगितले होते. नंतर दुसरी एक जाहिरात देऊन मी ही सुधारणा केली होती असाही युक्तीवाद केला. पण कोर्टाने तो अमान्य केला. आडकर यांनी कोर्टाला सांगितले की, मी औरंगाबादहून तेथे प्रक्टिसला येत होते. तेथे होत असलेल्या कायदेभंगाबाबत मला काही कल्पना नाही.
दरम्यान या निर्णयाचे अनेक डॉक्टर्सनी स्वागत केले आहे.
मुंबईच्या दोन डॉक्टरांना शिक्षा
- Details
- Hits: 3802
0