म.टा.टाईम्स
१२ ऑगस्ट २००९
मुंबई, महाराष्ट्र
८१ जणांना स्वाइन फ्लूचा संसर्ग
पुण्यात स्वाइन फ्लूचा संसर्ग झालेले ९ जण आतापर्यंत दगावले असले तरी स्वाइन फ्लूचे २८५ पेशंट उपचारानंतर ठणठणीत होऊन घरी परतले असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव शर्वरी गोखले यांनी दिली. दरम्यान राज्यात मंगळवारपर्यंत ३४ हजार ४०८ जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून ८१ स्वाइन फ्लू बाधित असल्याचे सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.
मुंबईत ४ हजार ४५८ जणांची स्क्रीनिंग टेस्ट करण्यात आली असून त्यापैकी १३०९ पेशंटंना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या फ्लूवरील टॅमी फ्लू या गोळ्या पेशंटची स्थिती बघून देण्यात येत आहेत, असे शर्वरी गोखले यांनी सांगितले.
मुंबईत दिवसभरात ३ हजार ७६८ जणांची तपासणी
स्वाइन फ्लुची लागण झाल्याच्या संशयावरून मंगळवारी आणखी १४ पेशंटना कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. विविध हॉस्पिटलमध्ये दिवसभरात ३७६८ पेशंटची तपासणी झाली, त्यापैकी ४४८ पेशंटच्या थुंकीचे नमुने तपासण्यात आल्यानंतर १४ पेशंटना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याच हॉस्पिटलमध्ये पाच पेशंट खडखडीत बरे झाले आहेत, तर गोरेगावच्या सिद्धार्थ हॉस्टिपलमधील चार पेशंटची प्रकृतीही उत्तम आहे.
कस्तुरबामधील आणखी पाच ते सात पेशंटची प्रकृतीही सुधारली असून येत्या पाच दिवसात त्यांना घरी सोडण्यात येईल. मुलंडच्या अगरवाल हॉस्पिटलमध्ये मंगळवारी दिवसभरात सर्वाधिक म्हणजे ६०० पेशंटची तपासणी झाली. मात्र सर्वाधिक ११४ नूमने कस्तुरबामध्ये घेण्यात आले. उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या १४ पेशंटपैकी १२ पेशंटवर कस्तुरबामध्ये तर दोन पेशंटवर सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पालिका व सरकारी अशा १३ हॉस्पिटलमध्ये तपासणीची व्यवस्था असून या सर्वच हॉस्पिटलमध्ये दिवसभर रांगाच्या रांगा लागल्या होत्या. सर्दी झाली तरी लोक तपासणीसाठी येत असल्यामुळे सर्वच हॉस्पिटलवर ताण पडू लागला आहे. फक्त सर्दी झाली म्हणून हॉस्पिटलमध्ये येऊ नका, सदीर्सह इतरही लक्षणे आढळली तरच तपासणीसाठी या, असे आवाहन पालिकेने केले आहे.
फ्लू बरा होतो...२८५ पेशंट घरी परतले
- Details
- Hits: 3880
1