महाराष्ट्र टाईम्स
नवी दिल्ली,
मटा ऑनलाइन वृत्त
मनाविरुद्धच्या प्रेग्नन्सीपासून वाचण्यासाठी महिलांना आता प्रत्येक आठवड्याला गर्भनिरोधक गोळ्या घ्याव्या लागण्याची गरज नाही. एक इंजक्शन घेतल्यावर त्यांना गोळ्या घेण्याच्या त्रासापासून एक-दोन आठवडे नाही तर तब्बल तीन महिने मुक्ती मिळू शकणार आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये गर्भनिरोधकामध्ये विविध प्रकार बाजारात उपलब्ध झाले आहेत. सुरवातीला केवळ कॉपर टी किंवा पुरुषांचे कॉडम हेच प्रकार उपलब्ध होते. मात्र, आता काळानुसार यात बदल झाले आहेत. गर्भनिरोधक गोळ्या, फिमेल कंडोम आणि आता तिमाही गर्भनिरोधक इंजक्शन उपलब्ध झाले आहे. या इंजक्शनचा वापर कोणत्याही वयाच्या महिला करू शकतो. मुलाच्या जन्मानंतर ६ आठवड्यानंतर या इंजक्शनचा उपयोग करता येतो.
डॉक्टरांचा सल्ला आवश्यक
आजकाल बाजारात अनेक प्रकारचे गर्भनिरोधक उपलब्ध आहेत. ही चांगली गोष्ट आहे, पण आपल्या मनात येईल तसा त्याचा वापर करणे चुकीचा आहे. असा वापर धोकादायक असल्याचं नवी दिल्लीतील एम्समधील वरिष्ठ गायनकलॉजिस्ट डॉ. अलका कृपलानी यांनी सांगितलं. खरं पाहता प्रत्येक माणसाच्या गरजा वेगवेगळ्या असतात त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच कोणत्याही गर्भनिरोधकाचा वापर करण्यात यावा. अनेक अभ्यासात असे लक्षात आले की गर्भनिरोधक घेतल्याने महिलांची हाडे ठिसूळ होतात. किंवा त्यांना वेळच्यापूर्वीच रजोनिवृत्ती (मोनोपॉज) येऊ शकते .
बाजारात उपलब्ध असलेले गर्भनिरोधक
ओरल बर्थ कंट्रोल पिल
या गोळ्या पहिले तीन आठवडे दररोज घ्याव्या लागतात. जो पर्यंत तुम्हांला मूल नको आहे.
मिनी पिल्स
ही गोळी दररोज एक घ्यावी लागते. ही गोळी आपातकालीन गर्भनिरोधक म्हणून वापरता येते.
इंट्रा यूट्रिन डिवाइस
कॉपरपासून तयार केलेलं टी आकारचं डिवाइस असते. याला यूट्रिन केविटीमध्ये लावले जाते. हे डिवाइस गायनोकॉलजिस्टच्या मदतीने बसवले जाते.
फीमेल कंडोम
हे डिस्पॉजेबल कंडोम असते. हे कंडोम महिला वापर करू शकतात. हे कंडोम पुरुषांच्या कंडोमच्या तुलनेत खूप महाग असतात.
प्रेग्नन्सी रोका तीन महिन्यांसाठी
- Details
- Hits: 8179
2