सकाळ वृत्तसेवा
८ मे २००९
जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त, इंडियन रेडक्रॉस सोसायटी पुणे जिल्हा शाखेच्या वतीने ८ मे रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य रेड क्रॉस शाखेच्या मानद सचीव होमाई मोदी यांच्या हस्ते संस्थेच्या रक्तसाठवण आणि वितरण केंद्र, एक्स रे तपासणी आणि सोनोग्राफी केंद्राचे उद्घाटन सकाळी साडेदहा वाजता करण्यात आले. इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे ऑफीस, डॉ बांदोरवाला आरोग्य केंद्र, रास्ता पेठ येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
ह्या दिनानिमित्त पुण्यातील चित्रपट गृहांमधे आणि नाट्यगृहांमधे रेडक्रॉस सोसायटीची पत्रके दिवसभर वाटण्यात आली.
जागतिक थॅलसेमिया दीन सजरा करण्यासाठीही आरोग्य केंद्रात रुग्णांची गर्दी झाली होती. थॅलसेमियाग्रस्त बालकांसाठी मोफत ’सेरम फेरिटिन टेस्ट’ आणि गरजू मुलांसाठी मोफत औषधोपचार आणि थॅलसेमियाग्रस्त बालकांची चित्रकला स्पर्धा असे विविध कार्यक्रम झाले. रेडक्रॉस सोसायटी तर्फे मुलांना शाळेचे डबे वाटण्यात आले.
थॅलसेमियाग्रस्तांचे काही पालक सांगत होते की जेव्हा पहिल्या मुलाला हा आजार झाला तेव्हा अर्थातच तो मोठा धक्का होता. परंतु जेव्हा दुस-याही मुलाला हाच आजार झाल्याचे समजले तेव्हा तर तो फारच मोठा आघात होता. ही व्याधी नेहमी अनुवंशिकतेतून आणि रक्त दोषातून होत असल्यामुळे ती एकाच पाल्याला कधीच होत नाही. झाली तर दोघांनाही होते. थॅलसेमिया स्वमदत गटाचे कार्यकर्ते श्री जतीन यांनी सांगितले की ह्या पुढे ह्या स्वमदत गटाचे उपक्रम वाढत जाणार आहेत. मुलांचे शिक्षण, स्वस्तात उपचार, पालकांमधील सजगता, सामाजिक बांधिलकी यावर सुद्धा भर देण्यात येणार आहे.
पुण्यात ‘रेडक्रॉस दीन’ आणि ‘जागतिक थॅलसेमिया दीन’ साजरा
- Details
- Hits: 2963
0