म. टा. टाइम्स
१२ ऑगस्ट २००९
पुणे, महाराष्ट्र
स्वाइन फ्लूच्या पेशंटांची संख्या पुण्यातच सर्वाधिक आहे. देशातील पहिल्या बळीची नोंदही पुण्यातच झाली. या आजाराचा फैलाव पुण्यातूनच देशभर झाला. या पार्श्वभूमीवर पुणेच का...? असा सवाल पुढे येणे साहजिक आहे. याचे उत्तर आहे पुण्यातील हवामान!
स्वाइन फ्लूच्या विषाणूला पोषक हवामान पुण्यातच आहे अशी माहिती येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) दिली. पुण्यातील सध्याचे हवामान ना थंड ना उष्ण असे आहे. नेमके हेच वातावरण स्वाइन फ्लूच्या विषाणूला पोषक ठरले. पुण्यातील या हवामानामुळे स्वाइन फ्लूची लागण येथे अधिक झाली, असे एनआयव्हीचे संचालक ए. सी. मिश्रा सांगतात. फ्लूवर नियंत्रण कसे मिळवायचे वा त्याच्याशी मुकाबला कसा करायचा याविषयी आम्ही सातत्याने आरोग्य यंत्रणांशी चर्चा करत आहोत, असे मिश्रा म्हणाले.
स्वाइन फ्लूवर नियंत्रण मिळवण्यासाठी जागतिक स्तरावर एखादी उपचार पद्धती उपलब्ध आहे काय यावर मात्र त्यांनी नकारात्मक उत्तर दिले. परिणामकारक ठरू शकेल अशी उपचार पद्धती उपलब्ध नाही, पण खबरदारी हाच सवोर्त्तम उपाय असल्याचे मिश्रा म्हणाले. पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्कालीन नियंत्रण संस्थेचे (एनसीडीसी) एक पथक शहरात दाखल आहे. त्यांनी पालिका आयुक्त महेश झगडे यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. चचेर्चा तपशील समजू शकलेला नाही.
पुणेच का...? म्हणे विषाणूसाठी पोषक
- Details
- Hits: 3980
0