लोकमत
१३-७-२००९
हीनाकौसर खान
विविध व्यसनाधीनतेतून महिलांना मुक्त करण्यासाठी यंदाच्या वर्षी जानेवारीत सुरु झलेल्या मुक्तांगणच्या ’निशिगंध’ प्रकल्पांतर्गत अत्तापर्यंत २५ महिलांनी लाभ घेतला. यात ४० ते ६० वयोगटातील अशिक्षित, अडाणी महिलांपासून ते उच्चशिक्षित महिलांचा समावेश आहे. यात प्रमुख्याने पुणे, मुंबई व आस्पास्च्या परिसरातील महिलांकडून अधिक विचारणा होताना आढळून येत आहे.
व्यसनी महिलांना यातून व्यसनमुक्त होण्यासाठी ’निशिगंध’ चा महिलावर्ग मदत करतो. त्यासाठी असणा-या सिस्टर, समुपदेशक, पॅरामेडिकल डॉक्टर या महिलाच आहेत आणि प्रत्येक व्यसनी महिलेला स्वतंत्रपणे मदत दिली जाते. या प्रकल्पाच्या समन्वयिका प्रफुल्ल मोहिते म्हणाल्या," सध्याच्या बदलत्या जीवनपद्धती, मौजेविषयीच्या संकल्पना, रिकामपण आणि प्रमुख्याने व्यसनी पदार्थांची उपलब्धता यामुळे महिला व्यसनाकडे वळतात. बहुतेकवेळा घरात कोणीतरी व्यसनी असते त्यामुळे घरगुती समस्या, नैराश्य, कमाचा ताण यासारख्या कारणांनी महिलाही स्वतःला गुंतवण्यासाठी व्यसनाकडे वळतात. पुरुषांच्या तुलनेत महिला लवकर व्यसनी होतात. नशा होण्यासाठी त्या केवळ दारुच नव्हे तर झोपेच्या गोळ्या घेणे, कफ सिरपचे सतत सेवन करणे यांसारखे प्रकार त्यांच्यात अढळतात आणि बहुतेकवेळा दारु कोरडीच पितात त्यामुळे त्यांच्या शरीरावर दुरगामी परिणाम होतो. प्रजनन क्षमतेवरही त्याचा विपरीत परिणाम होतो.
"अत्तापर्यंत उपचार आणि चौकशीसाठी आलेल्या बहुतेक महिला गृहिणी आहेत. त्यमुळे त्यांच्या कुटुंबावर,मुलांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. मुलांम्धे न्युनगंड निर्माण होतो. महिलांना त्यांच्या सामाजिक, कौटुंबिक नुकसानीची जाणिव करुन दिल्यास त्या लवकर ब-या होतात. मुळातच महिला हळ्व्या असल्याने कौटुंबिक प्रेमाची जाणीव झाल्यास त्या निग्रहाने यातून लवकर बाहेर पडतात असा सामाजिक अनुभव आहे. तुलनेत महिला लवकर प्रतिसाद देतात."
येथे महिलांसाठी म्युझिक थेरेपी, योगा थेरेपी, प्रणायाम या मध्यमांचा वापर केला जातो. नशा करायची इच्छा झाल्यावर काय करायच, नैराश्यावर कसा विजय मिळवायचा, भावनांचे हेलकावे कसे हताळायचे, कोर्सनंतर नातेसंबंध टिकविण्यासाठी काय करायचे हे शिकविले जाते. ३५ दिवसाच्या व्यसनमुक्ती कोर्सनंतर महिला यासगळ्या थेरेपीला सकारात्मक प्रतिसाद देऊ लागतात.
’निशिगंध’ ने दिला जीवनाचा मुक्त श्वास
- Details
- Hits: 3542
0