आरोग्य.कॉम
  • मुखपृष्ठ
  • पर्यायी उपचार पद्धती
    • आयुर्वेद
    • होमिओपॅथी
    • निसर्गोपचार
    • अ‍ॅक्युप्रेशर
    • अ‍ॅक्युपंक्चर
    • अरोमा थेरपी
    • बॅच फ्लॉवर औषधे
    • घरगुती उपाय
    • मसाज
    • योग
    • ध्यान
    • रेकी
    • संमोहन
    • बॉडीवर्क
  • आजार आणि रोग
    • सामान्य आजार
    • संसर्गजन्य आजार
    • विशिष्ट आजार
  • कुटुंबाचे आरोग्य
    • पुरूषांचे आरोग्य
    • वृध्दांचे आरोग्य
    • महिलांचे आरोग्य
    • मुलांचे आरोग्य
    • किशोर आरोग्य
    • प्रथमोपचार
    • तंदुरूस्ती
    • पोषक पदार्थ आणि अन्न
    • पाळीव प्राणी
  • आरोग्य संपदा
    • वैद्यकीय करियर
    • ग्रामिण आरोग्य
    • हॉस्पिटल्स
    • रुग्णहक्क समिती
    • आरोग्यासाठी टिप्स
  • विमा
    • आरोग्य विमा
    • वैद्यकीय नैतिकता
    • टेलीमेडिसीन
    • इच्छामरण
  • लैंगिकता
    • लैंगिकता म्हणजे काय?
    • लैंगिक शिक्षण
    • गर्भधारणा
    • विवाह
    • कामजीवन आणि अपंगत्व
    • मासिकपाळी
    • ट्रान्ससेक्शुअ‍ॅलिझम
    • शरीरभाषा
    • लैंगिकतेपार
    • फेटिशीझम
    • लैंगिक संवेदना गोठणे
  • स्व-मदतगट
    • एपिलेप्सी
    • स्किझोफ्रेनिया
    • पार्किन्सन्स
    • व्यसनमुक्ती
    • स्थुलता
    • कर्करोग
    • नैराश्य
    • अपंगत्व
    • मुत्रपिंड स्व-मदतगट
    • सेतू
    • कोड - पांढरे डाग
    • सहचरी मदत गट
Aarogya.com
English | ગુજરાતી | नोंदणी | लॉग-इन
  • मुख्यपृष्ठ
  • बातम्या आणि घडामोडी
  • वर्ष २००९
  • तंबाखू खाताय ? थांबा…

तंबाखू खाताय ? थांबा…

  • Print
  • Email
Details
Hits: 7966

सकाळ वॄत्तसेवा
१० जून २००९

तंबाखू हा महाखलनायक आहे. २० व्या शतकात तंबाखूने जगभरात १० कोटी लोकांना यमसदनी धाडले. २१ व्या शतकात तंबाखू हा विक्रम मोडून जगभरातील शंभर कोटी लोकांना देवाघरी पाठवणार आहे. २०१० मध्ये तंबाखू ६० लाख लोकांचा, २०२० मध्ये ७० लाख लोकांचा, २०३० मध्ये ८० लाख लोकांचा तर २०५० मध्ये एक कोटी लोकांचा बळी मिळविणार आहे. भारतात प्रतिवर्षी तंबाखूमुळे ८ ते ९ लाख लोकांचा मृत्यू होतो. त्यांपैकी १ लाख मृत्यू मुख कर्करोगामुळे होतात. तंबाखूमुळे त्याच्या प्रेमात पडलेल्या व्यक्तीचे आयुर्मान सरासरी १५ वर्षे कमी होते. आज तंबाखूच्या आहारी असणाऱ्या एक तृतीयांश लोकांचा तो पुढे प्राण घेणार आहे. तंबाखू हे एक व्यापारी उत्पादन असून, त्यामुळे होणारे मृत्यू व एवढी मनुष्यहानी जगातील कुठल्याही व्यापारी उत्पादनाने होत नाही. अशा प्रकारचे मानवाचा संहार थांबविणे कठीण असले, तरी अशक्‍य नाही.

तंबाखूच्या दुष्परिणांमाबद्दल जनजागृती व्हावी या हेतूने दर वर्षी जागतिक आरोग्य संघटना (WHO) ३१ मे या जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त एका विशिष्ट घोषवाक्‍याची घोषणा करून, त्या अनुषंगाने आपली तंबाखूविरोधी मोहीम राबवत असते. १९८८ पासून या प्रथेला सुरवात झाली आहे. या वर्षीचे घोषवाक्‍य आहे. "Health Warning of Tobacco'. "तंबाखूमुळे आरोग्यावर होणाऱ्या धोक्‍याचा सूचना.' तंबाखूमध्ये एकंदर ४००० घटक आढळतात. यांपैकी ४३ घटकांमुळे विविध अवयवांचा कर्करोग होऊ शकतो. म्हणजेच हे पदार्थ कर्कजन्य पदार्थ आहेत. याव्यतिरिक्त निकोटिन, कार्बन मोनॉक्‍साईड यांसारखे अतिशय घातक पदार्थ तंबाखूमध्ये असतात.

तंबाखू हे एक व्यापारी उत्पादन असल्यामुळे त्यात नेमके कुठले घटक पदार्थ असतात व त्या घटकांमुळे कुठले चांगले वा वाईट परिणाम होतात, हे माहीत करून घेणे, विशेषतः जे पदार्थ शरीरात सेवन केले जातात, हा त्या पदार्थाचा वापर करण्याऱ्या ग्राहकाचा हक्क असतो; तसेच ज्या व्यापारी उत्पादनामुळे शारीरिक धोका पोचू शकतो, त्या व्यापारी उत्पादनाबद्दल माहिती कळविणे हे निर्मात्याचे कर्तव्य ठरते.

तंबाखू हे एकमात्र व्यापारी उत्पादन असावे ज्याचा वापर करणाऱ्याला त्यामुळे जास्त व जीवघेणे नुकसान होते. त्यामुळे तंबाखूमुळे होणाऱ्या शारीरिक नुकसानीबद्दल इत्थंभूत माहिती द्यायची जबाबदारी सर्वांचीच आहे. त्यासाठी सार्वजनिक ठिकाणी सचित्र माहिती देण्याची चळवळ उभारण्याची गरज आहे. एक योग्य चित्र 1000 शब्दांपेक्षाही अधिक प्रभावी असते. जर त्यात स्थानिक भाषेचा उपयोग केल्यास ते अधिक परिणामकारक ठरू शकते. रेल्वे स्टेशन, सरकारी बस स्टॅंड, शासकीय कार्यालये, राष्ट्रीयीकृत बॅंका व इतर गर्दीच्या ठिकाणी या सूचना लावता येणे सहज शक्‍य आहे. "तंबाखू शरीरास अपायकारक आहे,' असे मोघम वाक्‍य लिहून काहीच साध्य होणार नाही. याउलट, "तंबाखूमुळे मुख कर्करोग होतो,' असा संदेश व त्यासोबत पायाच्या गॅंगरीनचे छायाचित्र दिल्यास निश्‍चितच जबरदस्त परिणाम साधला जातो. २००३ च्या FCTC (FCTC (Framework convention of tobacco control) च्या ११ व्या कलमानुसार सर्व सदस्य देशांनी अशी प्रत्यक्ष कृती करावी हे अपेक्षित आहे; मात्र जे लोक आज तंबाखूचे कुठलेच उत्पादन वापरत नाहीत; मात्र भविष्यात लवकरच त्याच्या नादी लागू शकतात, उदाहरणार्थ- शालेय विद्यार्थी त्यांच्यासाठी सार्वजनिक ठिकाणी लावलेले चित्रांसोबतचे संदेश उपयुक्त ठरतील. ते तंबाखूच्या फाशीच्या फंदातच पडणार नाही.
स्त्रियांना अधिक धोका
जगभरातील २५ कोटी स्त्रियांना तंबाखूच्या सवयी आहेत. भारतात १ कोटी २० लाख स्त्रियांना तंबाखूच्या सवयी आहेत. त्यांपैकी ५३ लाख भारतीय स्त्रिया धूम्रपान करतात, तर ६५ लाख भारतीय स्त्रिया तंबाखू खातात वा चघळतात. दुर्दैवाने जगभर स्त्रियांमध्ये तंबाखूची लोकप्रियता वाढत आहे.

तंबाखूमुळे स्त्रियांना गर्भाशयाचा, फुफ्फुसाचा, तोंडाचा व इतर अवयवांचा कर्करोग होण्याची शक्‍यता वाढते. तंबाखूमुळे स्त्रियांची प्रजनन क्षमता घटू शकते व रजोनिवृत्ती लवकर येऊ शकते.

तंबाखूमुळे अचानक गर्भपात होऊ शकतो.
तंबाखूमुळे स्त्रियांना होणारे बाळ कमी वजनाचे, मतिमंद, जन्मजात शारीरिक व्याधीसह वा मृत जन्माला येते. तंबाखूमुळे स्त्रियांच्या हिरड्यांना रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे हिरड्यांचे विकार वाढतात, त्यामुळे दात अकाली पडतात व विद्रूप दिसू शकतात. तोंडाला दुर्गंधी येते.

  • भारतात २३ कोटीपुरुषांना, तर जगभरातील १०० कोटी पुरुषांना तंबाखूच्या सवयी आहेत.
  • त्यांपैकी १३ कोटी पुरुष धूम्रपान करतात, तर १० कोटी भारतीय पुरुष तंबाखू खातात वा चघळतात.
  • मेंदू: तंबाखूमुळे मेंदूला होणारा प्राणवायूचा पुरवठा थांबून डीीेंज्ञ, लकवा होऊ शकतो व त्यामुळे तत्काळ मृत्यूसुद्धा होऊ शकतो.
  • फुफ्फुस: तंबाखूमुळे फुफ्फुसांना संक्रमक रोग अधिक होतात. सतत खोकला, दम लागणे व फुफ्फुसाचा कर्करोग मोठ्या प्रमाणात होतो.
  • हृदय: तंबाखूमुळे हृदयाला रक्तपुरवठा कमी होऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो व त्यामुळे तत्काळ मृत्यूसुद्धा होऊ शकतो.
  • यकृत: तंबाखूमुळे यकृताचा कर्करोग होऊ शकतो.
  • मुत्रपिंड व मूत्राशय: तंबाखूमुळे मूत्रपिंडाचा व मूत्राशयाचा कर्करोग होऊ शकतो.
  • दात, तोंड, हिरड्या: तंबाखूमुळे हिरड्यांना रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे हिरड्यांचे विकार वाढतात, त्यामुळे दात अकाली पडतात व विद्रूप दिसू शकतात. तोंडाला दुर्गंधी येते. तोंडाच्या सर्व भागाला जसे गाल, जीभ, ओठ, हिरड्या, टाळू कर्करोग होऊ शकतो.
  • पोट: तंबाखूमुळे अन्ननलिकेपासून, जठर, आतड्यांचा कर्करोग होऊ शकतो.
  • डोळे: तंबाखूमुळे डोळ्यांना इजा पोचून ( (Macular degeneration) अंधत्व येऊ शकते वा मोतीबिंदूसुद्धा होऊ शकतो. तंबाखूमुळे डोळे चुरचुरतात, फडफडतात, पाणी येते.
  • नाक: तंबाखूमुळे नाकातील आतील भागाला व सायनसचा कर्करोग (विशेषतः नस ओढणाऱ्यांना) होऊ शकतो. तंबाखूमुळे वास घेण्याची क्षमता मंदावते.
  • कान: तंबाखूमुळे कानाला संक्रमक रोग होऊ शकतात, ऐकायला कमी येते.
  • हाडे: तंबाखूमुळे हाडे ठिसूळ होऊ शकतात व ती आपोआप तुटू शकतात.
  • पुरुषांचे प्रजोत्पादन: तंबाखूमुळे शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते. वंधत्व येऊ शकते.
  • त्वचा: तंबाखूमुळे त्वचा रुक्ष पडते, त्यावर अधिक सुरकुत्या पडू लागतात व व्यक्ती अधिक वयस्क दिसू लागते.
  • केस: तंबाखूमुळे केसांना घाण वास व पिंगटपणा येतो.
  • हात: तंबाखूमुळे हाताला रक्तपुरवठा कमी होऊन हात थंड पडतात, हाताला गॅंगरीन होऊ शकते. हाताच्या बोटांची नखे तुटू लागतात.
  • पाय: तंबाखूमुळे पायाला रक्तपुरवठा कमी होऊन पाय थंड पडतात, पायाला गॅंगरीन होऊ शकते.
  • डॉ. विवेक पाखमोडे

9

Swine Flu

National Award for Outstanding achievement by a Non-Professional - Tushar Sampat

Introducing Digital Practice for Doctors & Healthcare professionals

विशिष्ट आजार
सामान्य आजार

आरोग्य नेटवर्क

आरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.

» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Pune Aarogya
Digital Media Dedicated to Healthcare of Punekars

वेबसाईटशी लिंक करा

aarogya logo

ईमेल कोड

आमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या

 आरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.

स्वास्थ्य साधने

  • हेल्थ डिरेक्टरी
  • संदेश बोर्ड
  • हेल्थ कॅल्क्युलेटर

आरोग्य.कॉम विषयी

आरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.

अधिक वाचा...

प्रस्ताव

हे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू

अधिक वाचा...

सदस्यांच्या प्रतिक्रया

“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.!”

  • आमच्या विषयी
  • प्रतिक्रिया
  • गोपनीयता नीति
  • साइट मॅप
  • संपर्क
  • मित्रांशी संपर्क साधा

कॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.