ई-सकाळ
जन्माच्या वेळचे वजन प्रमाणापेक्षा कमी असलेल्या मुलांना मोठेपणी "सॉल्ट सेन्सिटिव्हिटी'चा त्रास होतो. आहारातील मिठाचे प्रमाण वाढल्यावर त्याचा परिणाम लगेच वाढलेल्या रक्तदाबात दिसणे हे "सॉल्ट सेन्सिटिव्हिटी'चे मुख्य लक्षण आहे.........
कमी वजनाच्या बाळांना मोठेपणी चेतासंस्थेतील दोषांपासून बोधनक्षमतेतील कमतरता, क्षीण दृष्टी, वर्तनदोष अशा अनेक व्याधी सतावतात, हे यापूर्वीच दिसून आले आहे. आता स्वित्झर्लंडमधील संशोधकांनी त्यात आहारातील मिठाचे प्रमाण अधिक असणे आणि उच्च रक्तदाब यांचाही समावेश केला आहे. त्यांनी ११ वर्षे वयाच्या ५० मुलांच्या प्रकृतीचा अभ्यास केला. त्यात १५ मुले जन्माच्या वेळी सर्वसाधारण वजन असलेली तर ३५ मुले जन्माच्या वेळी कमी वजनाची होती. त्यांना एक आठवडा कमी मीठ असलेला आणि एक आठवडा जास्त मीठ असलेला आहार देऊन त्यांचा रक्तदाब मोजण्यात आला. तेव्हा जन्माच्या वेळी कमी वजन असलेल्या मुलांपैकी सुमारे ५० टक्क्यांच्या रक्तदाबात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले. अन्य मुलांमध्ये असा बदल दिसून आला नाही.
जन्माच्या वेळचे कमी वजन "सॉल्ट सेन्सिटिव्हिटी'ला कारण
- Details
- Hits: 4474
0