Print
Hits: 3675

म टा वृत्तसेवा
२९ जुलै २००९
नमिता जैन

योग्य काळजी घेतली नाही तर, संधीवाताची लक्षणं लहानपणापासूनच जाणवू लागतात.

हाडांचा ऱ्हास अशीच संधीवाताची शास्त्रीय व्याख्या सांगता येईल. म्हणजेच वयोमानानुसार हाडांचा आकार, वजन आणि सहनशक्ती कमी होणं. हाडांची सहनशक्ती कमी झाल्याने ते कमजोर बनतात, यामुळे त्यांच्यावर थोडाजरी भार पडला तर फ्रॅक्चर होण्याची शक्यता जास्त असते.

निदान
मेडिकल हिस्ट्री, काही शारीरिक तपासण्या, स्केलटल एक्सरे (हाडांच्या सापळ्याची चाचणी) आणि बोन डेन्सिटी स्कॅन (हाडांचं सर्वसाधारण वजन तपासणं) यांच्या आधारे डॉक्टर संधीवाताचं निदान करतात.

कारणं प्रौढांसाठी
रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेनचं संतुलन बिघडणं, गर्भाशय काढून टाकणं, कॅल्शियम, व्हिटॅमिन डीची कमतरता, बैठी जीवनशैली, सडपातळ देहयष्टी आणि कमी वजन, अतिरिक्त धुम्रपान, अनुवंशिकता, वैद्यकियदृष्ट्या तंदुरूस्त नसणं जसं, लिव्हरचा विकार, खाण्याची पथ्यं न पाळणं इत्यादी… पुरूषांपेक्षा महिलांमध्ये संधीवात होण्याची शक्यता जास्त असते.

लहान मुलांसाठी
जसंजसं वय वाढतं तसं, हाडाचा आकार आणि वजनही वाढतं. ही प्रक्रिया योग्यरित्या होत नसेल तर, संधीवात होण्याची शक्यताही वाढते. मुख्यत: महिलांमध्ये याचं प्रमाण जास्त असतं. वेळेपूवीर्च जन्माला आलेल्या आणि उशीरा यौवनात आलेल्या मुलामुलींनाही भविष्यात संधीवात होतो.

रजोनिवृत्तीनंतर महिलांना संधीवाताचा त्रास का होतो?
एस्ट्रोजेन हे हाडांना संरक्षण देणारं हामोर्न आहे. मात्र, रजोनिवृत्तीनंतर एस्ट्रोजेन हामोर्नमधील समतोल बिघडल्याने महिलांमधील हाडाचं लवकर घर्षण व्हायला लागतं.

तुम्हाला माहित आहे?

 

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.