म.ट.वृत्तसेवा
०६ ऑगस्ट २००९
चेन्नई, तमिळनाडू
पूर्वपरवानगी न घेता एड्स जनजागृती अभियानात महिला व मुलाचा फोटो वापरल्याचा फटका बुधवारी तामिळनाडू सरकारला बसला. मदास हायकोर्टाने संबंधित फोटो जनजागृती अभियानातून काढून टाकण्याचे आदेश राज्य सरकारच्या एड्स नियंत्रण सोसायटीला दिले आहेत. अभियानात आपला व मुलाचा फोटो वापरल्याने समाजात बदनामी होत असून कुटुंबियांनी बहिष्कृत केले आहे. त्यामुळे संबंधितांनी दिलगिरी व्यक्त करावी व एक कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी करणारी याचिका संबंधित महिलेने हायकोर्टात दाखल केली होती.
'एड्स' जाहिरातीवरून तामिळनाडू सरकारला फटका
- Details
- Hits: 3342
0