Print
Hits: 10759

साधारण दुखण्यांवर होमीओपॅथीचे उपचार
प्रतिबंध करणे, आणि निवारण करणे अशा दोन्ही प्रकारचे उपाय होमिओपॅथीद्वारे करता येतात. त्यामध्ये नुसते लक्षण बघुन नव्हे तर त्याचे कारण ओळखून त्यावर उपाय केले जातात. आणि अनेक व्याधीमध्ये त्याचे उत्तम परिणाम आढळून आलेले आहेत. तसेच ही औषधे कोणत्याही वयाच्या लोकांना देता येतात. पण गंभीर आजारामध्ये होमिओपॅथी चिकीत्सकाचा सल्ला घेणे केव्हांही चांगले.

साधे आजार आणि त्यावरील उपचारांची यादी खालीलप्रमाणे.

 • जळजळ होणे
 • डोकेदुखी
 • भाजणे
 • इन्फ्लुएन्झा
 • सर्दी
 • अपचन
 • खोकला
 • इजा होणे
 • दात येताना होणारा त्रास वेदना
 • जुलाब
 • जखमेमध्ये पू होणे
 • ताप येणे
 • दात दुखी
 • पोटात गॅस होणे
 • उलटया होणे
 • अस्थिभंग जंत होणे
 • रक्तस्त्राव जंत होणे.
 • होमिओपॅथीतील मलमेआर्निका: सर्वसाधारण वेदनेसाठी वापरतात. व्रण, मुका मार लंगडण्यासारखे वाटणे.
अपिस मेल: मधमाशा चावणे, डास चावणे, आणि इतर कीटक चावण्यावर अत्यंत उपयोगी सुजणे, एखादी जागा तेवढीच मोठी होणे आणि तो भाग मऊ मऊ वाटणे (त्वचा ताणली गेल्यामुळे)
सिम्फीटम: जखम भरुन येण्यासाठी वापरतात. बाहेरुन व्रण अथवा जखमांना हे वापरुन मलमपट्टी केली जाते.
हॅमेमेलिस: गरोदरपणाच्या काळात सुजलेली आणि आग आग करणारी मूळव्याध असेल तर त्यावर वापरतात. नीला सुजुन मोठ्या होऊन वेड्यावाकड्या होतात (वासरांमध्ये) तेव्हा वापरले जाते.
अर्टिका युरेन्स: प्रथमोपचराचे मुख्य औषध. कापणे, खरचटणे, लहान मुलांना त्याच्या कपडयामुळे त्या जागी आलेले चट्टे, ओठ सुकणे आणि त्याला भेगा पडणे तसेच हाताला भेगा पडणे. वायाचा त्रास होऊन अथवा थंडीमध्ये कातडी सुकणे अथवा त्यास जखमा होणे यांवर उपयोगी.
हायपेरिकम मलम: ज्यामध्ये मज्जातंतुची टोके असल्यामुळे वेदना होतात अशा जखमा (दरामध्ये बोट सापडणे) पसरलेली जखम सुकलेली कातडी, इसब, गरोदर काळात नीला मोठया होऊन वेडयावाकडया होणे यांना मऊ पडण्यासाठी.
हुजा: चामखीळ, बुरशी (कान, पाय, नखे) क्रीडापटुंना पायाला होणारा त्रास यांवर उपयोगी
असुलस: गरोदरपणात अत्यंत वेदना देणाऱ्या मुळव्याधीवर उत्तम.
ग्रॅफाईटस: कातडी सुकण्याचे अनेक प्रकार, त्वचा दुभंगणे, त्यातून रक्त येणे, स्तनाग्रांवरील जखमेमध्ये मेण घालून केलेल्या मिश्रणाचा बाहेरुन लावण्यासाठी वापर करतात.
हस टॉक्स: सांधेदुखी, कंबरेपासून खालचा भाग दुखणे (सायटिका) संधिवातामधील वेदणा. काही वेळा चालताना वेदना होन नाहीत पण बसल्यावर वेदना होतात अशा प्रकारावर हे वापरतात.