Print
Hits: 2558

व्हायटल फोर्स

शरीर, मन आणि आत्मा या तिन्हीची मिळून प्रत्येक व्यक्तीची एकसंघ अशी यंत्रणा असते. या तिहींचा समतोल म्हणजेच त्या व्यक्तीचे आरोग्य होय. हा समतोल राखण्याचे कार्य करणाऱ्या शक्तीस व्हायटल फोर्स अथवा चैतन्यशक्ती अथवा प्राणशक्ती असे म्हणतात.

व्यक्तीच्या आरोग्यदायी अवस्थेमध्ये व्हायटल फोर्स हा मध्यभागी असतो, तर अनारोग्यदायी अवस्थेमध्ये तो मध्यापासून दूर गेलेला असतो. त्यामुळे आजारी व्यक्तीवर औषधोपचार करून त्या व्यक्तीचा व्हायटल फोर्स पुन्हा मध्यभागी आणणे जरुरी असते. सदर औषधे ही त्या रोगाचा प्रतिकार करून त्याला शरीराबाहेर काढण्याइतपत प्रभावी असणे आवश्यक असते.