Print
Hits: 5839

माहिती गोळा करणे
रुग्णाचा इतिहास विस्तारपणे विचारला जातो तसेच रुग्णाची शारिरीक आणि मानसिक लक्षणे बघून त्याप्रमाणे रुग्णाची औषधयोजना निश्चित केली जाते. रुग्णाची माहिती गोळा करणे हे अत्यंत महत्वाचे समजले जाते कारण निदानासाठी तीच तुम्हाला दिशा दाखविते. रुग्णाला अनेक प्रश्न विचारुन त्याच्याकडून माहिती काढून घेतात ज्यामुळे रुग्णाची शारिरीक आणि मानसिक अवस्था अथवा विश्लेषण करता येते.

दिलेल्या औषधाचा जर पाहिजे तसा उपयोग झाला नाही आणि लक्षणे जर तशीच राहिली तर परत दुसऱ्यांदा चिकीत्सा केली जाते आणि दुसऱ्यांदा औषध योजना सुचविली जाते. ही कृति योग्य औषध मिळेपर्यंत केली जाते. स्वसंघटने प्रमाणे वापरतात तर औषधयोजना लांबलेल्या आजारामध्ये, छोट्या आजारामध्ये, त्वरित प्रकारच्या अजारामध्ये आजारांप्रमाणे विशीष्ट औषधयोजना करतात.

स्वतंत्र व्यक्तित्व/स्वयंघटना
दोन व्यक्ती एकसारख्या कधीही नसतात हे आपणास माहीतच आहे म्हणून प्रत्येक व्यक्तीला वेगळी औषधयोजना करावी लागते. बहुतेक होमिओपॅथ ‘घटनेनुसार’ पध्दतीची औषध योजना करतात ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीची स्वयंसंघटना अथवा शारिरीक, मानसिक, आणि भावनिक अवस्थेप्रमाणे त्याच्या व्यधीच्या विशिष्ठ लक्षणानुसार औषध योजना सुचविली जाते. खरे तर होमिओपॅथीमध्ये एकावेळी एकच औषध दिले जात नाही कारण त्यांची स्वयंघटना वेगळी असते. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव अथवा वृत्ती देखील वेगळी असते. पाच प्रकारच्या वृत्ति असतात उदा. सॅनगुईन, बिलीयस, लीम्फॅटीक, ल्युकोफ्लॅग्मॅटिक, आणि नर्व्हस प्रत्येक चिकीत्सक प्रत्येक व्यक्तीला या निरनिराळ्या प्रकारामध्ये नोंदतो. त्यानंतर रुग्णाचा शारिरीक आणि मानसिक वृत्तीचा अभ्यास केला जातो त्याची मानसिक जडण घडण कळण्याच्या दृष्टीने त्याला अनेक प्रश्न विचारले जातात आणि त्यानुसार औषध योजना सुचविली जाते.
मन
होमिओपॅथीच्या उपचारामध्ये माहिती गोळा करण्यासाठी ही महत्वाची गोष्ट समजली जाते. वेगवेगळ्या पातळीवर मनाचा अभ्यास केला जातो. जसे, इच्छा, भावना आकलनशक्ति आणि बौध्दिक पातळी.
इच्छा
प्रत्येकाला कशाची गरज असते ते यामध्ये कळते. उत्कट इच्छा, तिटकारा, आकांक्षा यामध्ये मोडतात. भावना/आकलन शक्ति मनाची भावनिक पातळी यामध्ये कळते. प्रत्येकाची भावनिक पातळी समजण्यासाठी त्याचा राग, संताप, निराशा, आणि भावनिक प्रश्न हाताळण्याची पात्रता या सर्व गोष्टींचे विश्लेषण केले जाते.
बौध्दिक पातळी
यामध्ये प्रत्येकाची बौध्दिक पातळी काढली जाते. एखाद्या परिस्थीतीमध्ये एखादी व्यक्ति कशी वागते त्या परिस्थीतीचे आकलन कसे करुन घेते हे यामध्ये बघितले जाते.