Print
Hits: 5081
Medicines औषधे

मात्रा काढण्याच्या शास्त्राला पोसोलॉजी म्हणतात. होमिओपॅथीमध्ये याला जास्त महत्व आहे कारण औषधे सौम्य करुन त्याची ३०, २००,१एम,१० एम,५० एम, आणि सी एम अशी मात्रा ठरवावी लागते. आधुनिक होमिओपॅथी मात्रा नेहमी सौम्य करताना त्याचे गुणोत्तर १।१ भाग पदार्थ ते ९ भाग सौम्य द्रावण (२०० सी) (२०० वेळा परत सौम्य करणे - १ भागपदार्थ ९९ बाग सौम्य द्रावणामध्ये) जास्त गुणोत्तर एम ने दर्शवितात (१ ते ९९९ गुणोत्तर) डॉ. हनिमान यांनी त्यांच्या प्रयोगामध्ये औषधांची दृढता वाढविण्यासाठी पाणी - अल्कोहोल च्या द्रवणामध्ये घालून पातळ केली आणि अति वेगाने मिक्षणे घुसळली (सक्शन).

होमिओपॅथीमध्ये रोग्याच्या स्थितीच्या विरुध्द प्रमाणात मात्रा दिली जात. जर या रोगांमध्ये शारिरीक बदल घडलेले दिसले, तर कमी मात्रेची औषधे वापरतात कारण त्यामध्ये अवयवावर परिणाम झालेला असतो. वरवर दिसणा-या आजारामध्ये जसे मानसिक परिणाम, वेदना एखादा अवयव दुखणे ज्यामध्ये शरीरामध्ये विकृती दिसून येत नाही अशा ठिकाणी जास्त मात्रेची औषधे वापरतात. चिकीत्सकाने आजार बघून त्याची माहिती विचारल्यानंतर स्वत:च्या अधिकारात औषधाची मात्रा ठरवायची असते.

होमिओपॅथीच्या टीकाकारांच्या मते जास्त सौम्य औषधामध्ये (जेव्हा जास्त मात्रा समजली जाते) उपचार करणारा एखादा देखील कण नसतो. तरीसुध्दा होमिओपाथीचा खालील आजारामध्ये उपयोग झालेला दिसून येतो जसे लहान मुलांमधील हगवण, हे फीवर (Hay fever) दमा आणि फ्लू (राष्ट्रीय आरोग्य संस्थेमध्ये अजून संशोधन चालू आहे.)

काही होमिआपाथी औषधे (जास्त मात्रेची) निरोगी माणसांना पातळ न करता देऊन त्याचे परिणाम बघितले जातात. या चाचण्यांमुळे मानसिक, भावनिक आणि शारिरीक बदल घडून येतात ते होमिओपॅथला कुठले औषध रोगागवर नीट उपचार देईल ते समजण्यास मदत होते. मागील २०० वर्षात, अशा प्रकारे अंदाजे २००० पदार्थांच्या चाचण्या घेण्यात आल्या.

औषध योजना
हल्ली साध्या आजारांसाठी होमिओपॅथीची उपाययोजना दुकानामध्ये मिळते. यामध्ये एखाद्या आजारावरची नित्याची उपाययोजना असते तसेच छोटया दुखण्यामध्ये स्वत:च उपचार करता येतात. खूप लांबलेल्या अथवा गंभीर आजारामध्ये धंदेवाईक होमिओपॅथ विशीष्ट एकटी उपाययोजना सांगतात.

होमिओपॅथ डॉक्टरांना त्यांच्या औषधांची शिकवणी घेतली जाते आणि ते डीग्री/डिप्लोमा शिकलेले अथवा त्यांच्या विषयात मास्टरी शिकलेले असतात. आणि त्यांचे नियंत्रण FDA ही संस्था करते. काही औषधाच्या दुकानात ही औषधे मिळतात. म्हणून रुग्णांनी होमिओपॅथीच्या दुकानातून घ्यावीत (with prescriptions).

औषधीद्रव्य
कुठलाही पदार्थ जो मनुष्य प्राण्याला रोग झालेला असताना दिला अथवा निरोगी व्यक्तिला दिला तर बदल घडवून आणतो त्याला औषध म्हणतात.

उपचार
विशीष्ट रोग अथवा आजार यावरील औषध जे उपचार करुन देते त्यास उपचार म्हणतात.