Print
Hits: 5336

होमिओपॅथीची औषधे खालील गोष्टींपासून तयार केली जातात.
वनस्पतीजन्य पदार्थ
यापासून तयार झालेल्या अंदाजे २००० औषधांची उपयोगिता सिध्द झालेली आहे. आणि ती जगभर वापरली जात आहेत. ही तयार करण्याची कृति एकमेव आहे. मूळ, खोड, पाने, फळ अथवा कधीकधी सबंध वनस्पती पासून मदर टिंक्चर (मूळ औषधे) तयार करतात आणि नंतर अल्कोहोल घालून ते पातळ करतात आणि प्रमाण बदलून वेगवेगळया प्रकाराची मात्रा निर्माण करतात या प्रकाराला सक्शन म्हणतात. (पातळ करुन हलविणे) सक्शन या प्रकारात औषध असलेली बाटली (मदर टिंक्चर मध्ये अल्कोहोल घालून पातळ करतात.) खूप हलवून वैद्यकीय शक्ति काढली जाते. या औषधाच्या अनेक प्रकारच्या मात्रा चढत्या क्रमाने 6X, 12X, 30C, 20C, 1000C (1M) 50M, CM अशा असतात. वनस्पतीजन्य औषधाचे उदाहरण म्हणजे अर्निका मोनटाना, ब्रायोनिआ अल्बा, सिंचोना ऑफिसीनॅलीस, पल्सेटिला निग्रीकांस, हस टॉक्स, सिंफीटम इत्यादी.
प्राणीजन्य पदार्थ
प्राण्यांपासून तयार केलेल्या औषधांची कृति वरीलप्रमाणेच आहे. फक्त औषध तयार करताना प्राण्याच्या शरीराचा एखादा भाग न वापरता सर्व प्राणी वापरला जातो. या प्रकारातील काही उदाहरणे खालीलप्रमाणे - लॅट्रोडेक्टस मॅक्टान्स, टॅरेंटुला हिस्पानिया (स्पॅनिस कोळी) टॅरेंटुला क्युबेन्सिस (क्युबेनी कोळी) नाजा ट्रायपुडिआन्स (नागराज) व्हायपर (रसेलव्हायपर घोणास) सेपिआ (कॅटल फिशचा वाहवलेला शाईसारखा रस) कन्थारिस (स्पॅनिश माशी).
खनिजपदार्थ
या प्रकारातील औषधे जास्त उपयोगी असतात आणि त्याचा औषधी उपयोग पण चांगला होतो. स्वतंत्र औषध अथवा संयुग घेऊन त्यापासून औषध तयार केले जाते. त्यामध्ये फॉस्फरस देखील असते. काही उदाहरणे, कॅलकेरिआ कार्बोनिका, (कॅल्शिअम कार्बोनेट - CaCo3) फॉस्फरस, कॅलकेरिआ, फॉस्फोटिका (कॅल्शिअम फॉस्फेट - Ca3(PO4), नॅट्रम म्युरिऍटिकम (सोडियम क्लोराईड - Nacl) यामध्ये काही आम्ले देखील असतात उदा. नायट्रिक ऍसिड (नायट्रिकम ऍसिडम), फॉस्फोरिक ऍसिड (ऍसिडम फॉस्फोरिकम) इत्यादि. काही धातु फॉस्फोरिक ऍसिड (ऍसिडम फॉस्फोरिकम) इत्यादी. काही धातु देखील यात असतात. उदा. तांबे (कयुप्रम मेटॅलिकम) लोखंड (फेरम मेटॉलिकम) सोने (ऑरम-मेटॅलिकम) या धातुंची दृढता सॅकरम लॅक्टिस (लॉक्टोज साखर) घालून वाढविली जाते ज्यामुळे या धातुमधील विषारीपणा कमी होतो आणि तीव्रता कमी होते आणि जास्त मात्रेचे औषध या धातूंपासून मिळते.
नोसोडस
ही औषधे प्राण्यांच्या स्त्रावापासून अथवा रोगट अवयवांपासून तयार करतात. ते औषध नंतर विषारीपणा कमी करण्यासाठी पातळ करतात. आणि त्यानंतर पुढे सक्शन या पध्दतीने त्याची मात्रा वाढतात उदा. ऍन्थेरेसिनम (मेंढीची रोगट प्लीहा) मेडोरिन्म (घोडयाचे रोग ग्रीस (Grease).
सार्कोडेस
ही औषधे प्राण्याच्या स्त्रावापासून पण निरोगी अवयवांपासून बनवितात. उदा. पँक्रीऍटिन, (स्वादुपिंडाचा स्त्राव) निरनिराळया रोगांवर उपचारासाठी जास्त मात्रेची औषधे वापरतात.
इमपोन्डेराबिलीया
ही होमिओपॅथीची महत्वाची आणि एकमेव गोष्ट आहे. औषधे जगभरातल निरनिराळया शक्तीपासून बनविली जातात. उदा. अल्कोहोल, क्ष किरणाना उघडे करतात. औषधे चंद्रकिरणांपासून देखील बनविली जातात.