डॉ. मेस्मेर यांच्या अनेक शिष्यांनी या शास्त्राचा संपूर्ण युरोपभर प्रचार सुरु केला व अनेक नवनवीन प्रयोगांअंती प्रत्येक प्राणिमात्रांमध्ये प्राणशक्ति असून रुग्णाच्या शरीरावर हस्तसंचार करुन त्यास निद्रावस्था प्राप्त होऊ शकतो हे तत्व मोडले. डॉ. मेस्मेर यांच्या शिष्यांनी या पध्दतीला शास्त्रीय बैठक दिली व या विद्येचे नाव आपल्या गुरुच्या स्मरणार्थ ऍनिमल मॅग्नेटझम ऐवजी ‘मेस्मेरिझम’ असे ठेवले व नंतरच्या काळात या शास्त्राचा झपाट्याने प्रसार झाला व युरोप भर अनेक मेस्मेरिस्ट तयार झाले.
हिप्नॉटिझम
मेस्मेरिझमला थोतांड मान-यापैकी डॉ. जेम्स ब्रेड यांनी जेव्हा मेस्मेरिझमचे प्रयोग पाहिले. तेव्हां ते आश्चर्याने चकितच झाले. मेस्मेरिक अवस्थेत रुग्णास टोचलेल्या सुयांची जाणीव होत नाही हे पाहून ते भारावून गेले व स्वत:च्या शास्त्राचा सखोल अभ्यास सुरु केला. हज़ारो रुग्णांवर प्रयोग करुन डॉ. जेम्स ब्रेड यांनी या विद्येला जवळ-जवळ परिपूर्ण शास्त्रीय बैठक दिली. कोणत्याही प्रकारच्या हस्तसंचाराशिवाय सूचनांव्दारे सुध्दा निद्रा प्राप्त करता येते याचा शोध लावला व या शास्त्राला मेस्मेरिझम ऐवजी "हिप्नॉटिझम" असे नाव दिले. ग्रीकमध्ये ‘हिप्नॉझ" ही झोपेची देवता आहे व यावरुनच या शास्त्राला हिप्नॉटिझम हे नाव देण्यात आले."हिप्नॉटिझमला" आता जगभर मान्यता मिळाली असून अनेक देशात या शास्त्रावर वेगवेगळ्या प्रकारे संशोधन चालू आहे.
मनाचा मागोवा
‘एक मन म्हणतं करावं आणि दुसरं म्हणतं करु नये.’ ही अवस्था जवळ जवळ सर्वांचीच ब-याच वेळा होते. म्हणजेच आपल्यामध्ये दोन मनांचे वास्तव्य आहे हे सर्वांना ठाऊक आहे. फक्त त्याची शास्त्रीय माहिती नसल्याने योग्य अयोग्याचा निर्णय करणे ब-याच वेळा जमत नाही. या पुस्तकात मानसशास्त्राच्या क्लिष्ट सिध्दांताची माहिती करुन देण्याचा उद्देश नाही. तरी सुध्दा संमोहन हे मनाचे शास्त्र असल्याने परिचय करुन देणे गरजेचे आहे.
आपल्या शरीरावर बाह्यमन व अंतर्मन अशा दोन मनांचे नियंत्रण असते. जागेपणी होणा-या सर्व क्रिया या बाह्यमनाच्या नियंत्रणाखाली होतात. तरीसुध्दा त्यास प्रेरणा मात्र अंतर्मनाचीच असते. झोपेत मात्र बाह्यमन सुप्त होते. अंतर्मन हे सदोदित जागृत असते. जन्मल्यापासून चालू क्षणापर्यंत घडलेल्या सर्व घटनांची नोंद अंतर्मनात असते व त्या संस्काराप्रमाणे बाह्यमनास प्रेरणा देऊन सहेतुक क्रिया घडवल्या जातात. उदा. अंधारात भूत असते ही लहानपणी ऐकलेली गोष्ट आपण मोठे झालो तरी विसरत नाही. जेव्हां-जेव्हां आपण अंधार पाहतो. तेव्हां तेव्हां आपल्या मनात भितीची भावना निर्माण होते. मोठेपणी कितीही (बाह्य) मनाची समजूत घातली तरीसुध्दा अंधारातील भुताची भिती मनांतून (अंतर्मनातून) जात नाही.
अशाच प्रकारे एक दोन नव्हे तर हजारो विचारांनी आपले अंतर्मन संस्कारीत झालेले असते. त्यातील काही संस्कार इष्ट व काही अनिष्ट असतात व त्याचमुळे आपले जीवन घडत असते. इष्ट संस्कारांनी जीवन यशस्वी होत असते तर अनिष्ट संस्कारांनी जीवनात अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होतात. त्यामुळेच लहान सहान घटनांनी मनांत ताण तणाव निर्माण होतात. नको त्या गोष्टींची काळजी वाटत राहते न घडणा-या घटनांची काल्पनिक भिती मनांत घर करुन बसते. चिंता व भिती यामुळे रात्री शांत झोप येत नाही. दारु, सिगारेट, तंबाखू या सारखी व्यसने जडतात. विवाहितांमध्ये लैगिक समस्या निर्माण होऊन कामतृप्ती होत नाही. स्मरणशक्ति कमी झाल्यासारखी वाटते, वरिष्ठांचे मनांवर सदोदित दडपण राहते. डोकेदुखी, रक्तदाब, ऍसिडिटी, अल्सर, ह्रदयविकार या सारखे आजार जडतात. सतत अस्वस्थ वाटू लागते. असुरश्रिततेच्या भावना निर्माण होतात. जगात आपले कोणीही नाही अशी एकटेपणाची भावना होते.
अनेक लोक अशाप्रकारे ताण तणावयुक्त जीवन जगत असतात व ‘यालाच जीवन ऐसे नाव’ म्हणून स्वत:ची समजूत घालतात. वास्तविक या सर्व विकारांमागे अंतर्मनाची जडण घडण हे प्रमुख कारण असते. म्हणजेच या शक्तिशाली अंतर्मनाला चांगल्या विचारांनी संस्कारीत केले तर ‘न भूतो न भविष्यति’ असे फलदायी बदल घडवणे सहज शक्य आहे. अंतर्मनाची ताकद बाह्य मनापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. याचा फायदा करुन घेण्यासाठी चांगले विचार म्हणजेच चांगल्या सूचना अंतर्मनापर्यंत पोहचल्या पाहिजेत.
होकारात्मक विचारसरणी
"मियॉं क्यों रोते हो?", बोले क्या करे सूरत ही ऐसी है।" अशी उदाहरणे पदोपदी आढळतात. बरेच लोक सदोदित चिंतित राहतात त्यांना चिंता करण्यासाठी कोणतेही कारण चालते. उदाहरणार्थ: महागाई वाढली, कार्यालयात नवीन वरिष्ठ अधिकारी बदलून आला, समाजात गुंडगिरी फार वाढली आहे, इथपासून तर सध्या अमेरिका व चीनचे संबंध ताणले गेले आहेत, महायुध्द सुरु झाल्यास काय होईल? थोडक्यात प्रत्येक घटणारी घटना माझ्या जीवनात त्रासदायकच घडणार आहे अशी ठाम समजूत करुन घेऊन हे लोक चिंताग्रस्त होतात. पुढे पुढे चिंता, काळजी हा यांचा स्थायीभाव बनतो व जीवनाकडे फक्त नकारात्मक विचारानेच पाहत राहतात. परिणामी पदरी बयाच वेळा अपयश येते. मात्र त्याचे खापर दुसयांच्या माथी फोडून रिकामे होतात.
खरं तर नकारात्मक विचारसरणी हाच त्यांच्या जीवनातला दोष असतो. कुठे प्रवासाला निघाले तर बस वेळेवर मिळेल का? त्यात जागा मिळेल का? प्रवासात पैसे हरवतील का? अशा एक ना दोन शेकडो नकारात्मक विचारांचे थैमान त्यांच्या डोक्यात चालू असते. हे स्वत:ही प्रवासाचा आनंद घेत नाहीत व आपल्या बायकोमुलांनाही घेऊ देत नाही. प्रत्यश्रात कधी न घडणारया काल्पनिक वाईट घटनांनी हे लोक सदोदित चिंतीत राहतात. त्यांच्या सोबत राहणाया लोकांनाही अशीचं नकारात्मक विचारसरणीची सवय लागते अशाच विचारांमुळे परीक्षेची पूर्ण तयारी झालेल्या विद्यार्थ्याला परीक्षेत प्रश्नांची उत्तरे नीट आठवत नाहीत तर हुशार आणि होतकरु उमेदवाराची मुलाखतीला बोबडी वळते.
वरील सर्व उदाहरणे पाहिली असता दैनंदिन जीवनात होकारात्मक विचारांची सवय लावून घेणे किती महत्वाचे आहे हे लक्षात येईल. यासाठी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला पाहिजे.
होकारात्मक विचारसरणीची पहिली पायरी म्हणजे आत्मविश्वास. कोणतेही काम करताना ते पूर्ण आत्मविश्वासाने करा. त्याबाबत मनांत उगीचच शंकाकुशंका बाळगू नका. "परीक्षेत मला उत्तम यश मिळणार आहे व त्यासाठी मी भरपूर अभ्यास करणार आहे." केवळ एवढ्या विचारांनेच तुमच्या अभ्यासाचा उत्साह व्दिगुणीत होईल व मन स्थिर राहिल्यामुळे परीक्षेत व्यवस्थित उत्तरे आठवतील." डॉक्टरांनी दिलेले औषध मला नक्कीच लागू पडेल व या आजारापासून मी लवकर बरा होइन." हा विचार डॉक्टरांच्या औषधापेश्राही प्रभावी ठरतो. याबाबत एक बोलके उदाहरण आहे.
एक डॉक्टर पती व पत्नी चित्रपट पाहात असताना पत्नीस मळमळू लागले. बेचैन झालेल्या पत्नीने आपल्याला मळमळत आहे असे डॉक्टरांना सांगितले. चित्रपट पाहाण्यास समरस झालेल्या डॉक्टर महाशयांनी अंधारातच खिशातून एक गोळी काढली व पत्नीच्या हातात देत म्हणाले" ही गोळी तोंडात ठेव म्हणजे बरे वाटेल." आपले पती एक निष्णात डॉक्टर आहेत याची पत्नीला जाण होती त्यामुळे दिलेल्या गोळीमुळे आपली मळमळ थांबेल या तिच्या होकारात्मक विचारसरणीमुळे थोड्याच वेळात तिला बरे वाटू लागले. चित्रपट संपून बाहेर आल्यावर डॉक्टर महाशय भानावर आले, आपण पत्नीला कोणती गोळी दिली हेच त्यांना समजेना म्हणून त्यांनी चघळत असलेली गोळी काढून दाखवण्यास सांगितले तर काय आश्चर्य! ती गोळी नसून ते कोटाचे बटण होते. या उदाहरणावरुन होकारात्मक विचार सरणी किती प्रभावीपणे कार्य करु शकते हे दिसून येते.
तात्पर्य
तुमच्या मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास बाळगा, जीवनाकडे आनंददायी नजरेने पहा प्रत्येक बाबतीत मी यशस्वी होणार आहे, अशी खात्री बाळगा. यशस्वी होण्यासाठी मी भरपूर कष्ट व प्रयत्न करणार आहे, ही धारणा मनात ठेवा. चुकून एखाद्या वेळी अपयश आलेच तर खचून न जाता पुन्हा जोमाने कामास लागा.
मेस्मेरिझम
- Details
- Hits: 8598
5
संमोहन
रेकी: तुम्हांला माहीत आहे का?
