Print
Hits: 10122

सूर्यनमस्कार ही सूर्य देवाला नमस्कार करण्यासाठी क्रमाने करण्याच्या योगमुद्रांची एक स्थिती आहे. सूर्यनमस्कार जर सुयोग्य रितीने केले तर त्याचा शरीराला, शरीराच्या हलचालींना, मन:स्वास्थ्याला, आणि काही प्रमाणात मन पवित्र रहाण्यासही मदत होते.

येथे अकृत्यांसहीत सूर्यनमस्काराची प्रत्येक मुद्रा आणि त्याचे वर्णन दिले आहे. सुरवात करण्यासाठी दोन हातांचे अंगठे जुळवून छातीशी जुळवून नमस्कार करून ताठ उभे रहावे.

नमस्कारासन
नमस्कारासन

मुद्रा - ०: श्वास नेहमीप्रमाणे घ्यावा.
नमस्कारासन: दोन हातांनी नमस्कार करून, अंगठे आणि तळवे जुळवून, हात छातीशी धरावेत. नमस्कार स्थितीतील हातांची खालची बाजू जमिनीस समांतर असावी. व्यवस्थित कसे उभे रहावे ह्या साठी हा अतिशय चांगला व्यायाम आहे. शरिराचे पूर्ण वजन दोनही पायांवर समप्रमाणात विभागले गेले असावे. पोटाचे स्नायू ताठ असावेत जेणे करून त्या सायूंनाही व्यायाम होईल.

उर्ध्वनमस्कारासन
उर्ध्वनमस्कारासन

मुद्रा - १: श्वास घेणे.
उर्ध्वनमस्कारासन: दोनही हातांचे तळवे जुळलेले आहेत, ते आता हळूहळू कानांना समांतर नेत वरती न्यावेत. हात जुळलेले वर नेणे शक्य होत नसल्यास हळूहळू सोडावेत. नजर हातांकडे ठेवत, हात वर गेल्यावर वरती बघत, शरीरही मागे झुकवावे. ह्यामुळे शरिराच्या पुढील भागास पायाच्या अंगठ्यापासून ते कपाळापर्यन्त व्यायाम होतो. ह्या स्थीतीमुळे पाठीच्या खालील आणि वरिल भागासही व्यायाम होतो, आणि आपली छातीही भरदार होण्यास मदत होते. हात आणि डोक्यामधील रक्ताभिसरण वाढते.

अधरासन किंवा उत्तरासन
अधरासन किंवा उत्तरासन

मुद्रा - २: श्वास सोडणे.
अधरासन किंवा उत्तरासन: येथे तुमचे शरीर खाली झुकले आहे. गुडघे ताठ ठेऊन दोन्ही तळवे जमिनीस टेकवावेत, आणि डोके गुडघ्यास टेकवावे. पोटाच्या स्नायूंसाठी, दंडांसाठी आणि गुडघ्यांच्या स्नायूंसाठी ह्या मुद्रेने खूप चांगला व्यायाम होतो.

एक पाद प्रसन्नासन
एक पाद प्रसन्नासन

मुद्रा - ३: श्वास घेणे.
एक पाद प्रसन्नासन: ह्या मुद्रेमधे एक पाय मागे - खाली जातो. दोन तळवे पुढे असलेल्या पावलाच्या दोन बाजूंस जमिनीला टेकतील. मागे जाणा-या पायाचा गुडघा जमिनीस टेकेल, आणि डोके वर करून आपली नजर वरती जाईल. दोनही पाय, पाठीचा खालचा कणा आणि छाती ह्यासाठी हा उत्तम व्यायाम आहे.

द्विपादप्रसन्नासन अथवा चतुरंग दंडासन
द्विपादप्रसन्नासन अथवा चतुरंग दंडासन

मुद्रा - ४: श्वास सोडणे.
द्विपादप्रसन्नासन अथवा चतुरंग दंडासन: ह्या स्थितीमध्ये आपला पुढे असलेला पाय मागे जाऊन आधी मागे गेलेल्या पायास जुळतो. आपली कंबर थोडी वरती जाते परंतु पाय उतरत्या स्थितीत असतात, आणि शरीराचा भार हा मागे गेलेल्या पायांच्या बोटांवर आणि पुढे टेकलेल्या तळव्यांवर असतो. चेहेरा सरळ ठेवावा आणि नजर समोर रोखावी जेणे करून आपल्याला पुढील १० फूट अंतरापर्यंतचे दिसावे. ह्या मुद्रेमध्ये १५ सेकंद रहावे. संपूर्ण शरीरास चांगल्या त-हेने ताण पडल्यामुळे रक्ताभिसरण उत्तम होते.

अष्टांग नमस्कारास&#x0928
अष्टांग नमस्कारास&#x0928

मुद्रा - ५: श्वास सोडणे आणि रोखून धरणे.
अष्टांग नमस्कारासन. शरीर पूर्ण खाली झोकून द्यावे आणि कपाळ-छाती-गुडघे जमिनीस टेकवावेत. ह्या स्थितीत ५ सेकंद रहावे. डोके, खांदे आणि छातीच्या स्नायूंसाठी हा उत्तम व्यायाम आहे.

भुजंगासन अथवा ऊर्ध्व मुक्त शवासन
भुजंगासन अथवा ऊर्ध्व मुक्त शवासन

मुद्रा - ६: श्वास घेणे.
भुजंगासन अथवा ऊर्ध्व मुक्त शवासन: मुद्रा ५ नंतर दोनही हात समोर टेकलेलेच ठेऊन पूर्ण शरीर समोर उचलावे, आणि पायाच्या बोटांवर शरीर तोलावे. जमिनीपासून वर पर्यन्त शरीर वळलेले रहाते. हा पाठीची खालील बाजू, खांदे, मान, छाती, पोट ह्यासाठी हा अतिशय उत्तम व्यायाम आहे.

अधोमुख शवनासन
अधोमुख शवनासन;

मुद्रा - ७: श्वास सोडणे
अधोमुख शवनासन: पावले मागच्या बाजूला पूर्ण टेकवून आणि तळवे पुढील बाजूस होते तसेच टेकलेले ठेऊन शरीर विरुद्ध दिशेने ओढून घ्या. पायांच्या टाचा जमिनीला टेकलेल्या आहेत ह्याची खात्री करून घ्या. गुडघे वाकवू नका. मणका पूर्णपणे ताणला जाईल ह्याची काळजी घ्या. पोट आत ओढा, छाती बाहेर काढा. डोके आत घेताना हनुवटी छातीला टेकवण्याचा प्रयत्न करा. ही शरीर मुद्रा एखाद्या टेकडी सारखी दिसेल. पाय, पावले, काखेतील स्नायू, मांड्या, मानेची मागची बाजू, ह्या सर्व अवयवांसाठी ही मुद्रा अतिशय उपयोगी आहे. खेळाडूंसाठी फायद्याची आहे.

मुद्रा - ८: श्वास घेणे.
एक पाद प्रसरण आसन
मुद्रा ३ प्रमाणे करणे.

मुद्रा - ९: श्वास सोडणे.
अधरासन किंवा उत्तानासन
मुद्रा २ प्रमाणे करणे.

मुद्रा - १०: श्वास घेणे.
नमस्कारासन
मुद्रा ० प्रमाणे करणे.