Print
Hits: 7657

प्रार्थना हे योगाचे अनिवार्य अंग नाही मात्र योगात प्रार्थनेला महत्व आहे. प्रार्थनेत माणसाचे चित्त एकाग्र होते. श्रध्दा भाव उत्पन्न झाल्यामुळे ग्रहण शक्तीही वाढते. आत्मबल वाढण्यास मदत होते.

‘ओम’
ओम सहनाववतू साहनोभुनक्तू सहवीर्य करवाहै
तेजस्विनावधीतमस्तु माहीद्विषावहे
ओम शांती: शांती: शांती:
गुरूब्रम्हा गुरूर्विष्णु गुरूदैवो महेश्वरा
गुरू: साक्षात्‌ परब्रम्ह:तस्मै श्री गुरूवैनम:
मा सदगमय तमसो मा ज्योर्तिगमय
मृत्योर्मा अमृतं गमय
ओम सर्वेषां स्वस्तीर्भवनु सर्वेषां शांतिर्भवतु
सर्वेषां पूर्ण भवतू सर्वेषां मंगल भवतू
सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे सन्तूनिरामया:
सर्वे भद्राणी पश्‍चन्तु मा वृश्‍चिद्‌ दु:ख भाग्‌ भवेत्‌
ओम भू:र्भुव स्व: ओम तत्सवितुर्वण्य़ं भर्गोदेवस्य धीमही
धियो योन:प्रचोदयात्‌
ओम शांती: शांती: शांती:
‘शुभं भवतु’


प्रणव यंत्र
ओम चा उच्चार करणे अत्यंत आवश्यक आहे. यात कोणतेही धार्मिक अवंडबर नाही तर शास्त्रशुध्द विज्ञान आहे. ओम चा उच्चार करताना खालील गोष्टी कराव्या म्हणजे लाभ वाढतील.
ओम चे उच्चारण ४ प्रकारे करता येते.
प्रकार १ - ओ ची मात्रा दीर्घ म्‌ ची मात्रा लहान
प्रकार २ - ओ ची मात्रा लहान म्‌ ची मात्रा दीर्घ
प्रकार ३ - ओ ची व म्‌ ची मात्रा समान व दीर्घ
प्रकार ४ - ओ ची व म्‌ ची मात्रा समान व लहान

यातील पहिल्या प्रकारे ओम चे उच्चारण हे दमा व्याधीग्रस्त माणसासाठी प्रमाणित आहे. यासाठी कोणत्याही ध्यानाच्या आसनात बसावे.