योगाभ्यास हा व्यायाम प्रकार नाही (योगाभ्यासानंतर थकवा जाणवू नये)
- योगाअभ्यास ही शिथिलतेची कला होय.
- चेतना श्वासावर ठेवावी.
- आसन करताना शरीरावर ताण येणार नाही अशी काळजी घ्यावी.
- सुखपूर्वक आणि विनासायास असतानाच अभ्यास करावा.
- योगाअभ्यास सुरू करताना आसन स्थितीत एकदम फार काळ राहू नये, मात्र हळू हळू वेग वाढत जावा.
- कपडे सैल असावेत, अंगाला चिकटणारे नसावेत, शक्यतो सुती असावेत.
- योगाअभ्यास शिकताना पुस्तके वाचूनच केवळ करू नये तर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावा.
- योगाअभ्यासात साधारणत: आसन, बंध, मुद्रा नंतर क्रिया शेवटी प्राणायम असा क्रम असावा.
- सूर्योदयापूर्वीची वा सूर्योदयाच्या जवळची वेळ आदर्श वेळ आहे. सायंकाळाची वेळ चांगली आहे.
तथापि सोईनुसार रिकाम्या किंवा हलक्या पोटी अन्य वेळीही योग्याभ्यास करण्यास हरकत नाही. - योगासनापूर्वी आंघोळ करणे श्रेयस्कर, मात्र योगाभ्यासानंतर अर्ध्या तासाने आंघोळ करावी.
- योगाअभ्यास करण्यासाठी ब्लँकेट ४ पदरी, किंवा घोंगडी अथावा जाड चादर किंवा सुती जाड आसन असावे.
- गादीवर वा नुसत्या जमिनीवर योगासने करू नयेत.
- हवेशीर, शांत, पुरेसा प्रकाश असलेली जागा उत्तम, बगीच्यात किंवा घरातल्या मोकळ्या खोलीत अथवा गच्चीवर योगासने करता येतात.
- योगाअभ्यास करत असताना आहार हा फारसा जाड अन्न असलेला नसावा सुपाच्या जेवण असावे.
- पूर्ण जेवणानंतर ४-४ १/२ तासाने, भरपूर नास्ता, नंतर २ ते ३ तासाने आणि कपभर पेयानंतर अर्धा पाऊण तास वेळ गेल्या नंतर योग्याभ्यास करावा.
- योगाभ्यासानंतर अर्ध्या तासाने जेवण वा अन्न घेण्यास सुरूवात करावी.