Print
Hits: 4804

होमिओपॅथीने कॅन्सर बरा होतो का?

जेव्हा आधुनिक उपचारांचा उपयोग होत नाही तेव्हा बहुतेक लोक पर्यायी पध्दतीकडे वळतात. इतर लोक त्यांची टवाळी करतात आणि त्यांची चेष्टा करतात. पण तरीसुध्दा अनेक लोक या पध्दतीचा अवलंब करीत आहेत आणि त्याचा त्यांना फायदाही झालेला आहे. पुण्यामध्ये कॅन्सरचे रुग्ण वेगळे उपाय करीत आहेत ज्यामध्ये उत्तम गुण त्यांना अनुभवास मिळाले आहेत.
ती पध्दत आहे होमीओपॅथी आणि व्यक्ती आहे डॉ. संतोष भन्साळी. जिथे आधुनिक पध्दतीचा उपाय झालेला नाही अशा तीनशेहून अधिक जणांना त्यांच्या उपायांचा फायदा झाला आहे.

होमिओपॅथीमध्ये कॉम्प्युटरचा उपयोग

Computer
कॉम्प्युटर
होमिओपॅथीच्या उपचारमध्ये कॉम्प्युटर महत्वाची भूमिका बजावीत आहेत. प्रत्येक वेगळ्या रुग्णाची लक्षणे आणि इतिहास जमा करुन रुग्णांना औषधे देऊन त्यांच्यावर उपचार करणे, अशा प्रकारची असंख्य रुग्णांची माहिती कॉम्प्युटरमध्ये जमा करता येते.