विपश्यना साधना ही भारताची अत्यंत प्राचिन आध्यात्मिक विद्या आहे. भगवान बुध्दांनी २५०० वर्षापूर्वी तिचे पुर्नसंशोधन केले. त्यांनी आपल्या जिवन काळात संबोधी प्राप्तीनंतर ४५ वर्षे जो अभ्यास लोकांकडुन करविला त्याचे हे सार आहे. संपुर्ण दुख:मुक्त्ती अनुभवलेल्या त्यांच्या अहर्त भीक्षुंनी लोककल्याणासाठी भारतभर चारिका करीत प्रचार केला. काही शिष्यांनी भारताबाहेरच्या राष्ट्रात या विद्येचा प्रचार केला. ही साधना शेजारच्या राष्ट्रांनी शुद्द स्वरुपात संभाळली त्यामुळे भारतात पुर्णत: लुप्त झालेली ही विद्या ब्रम्हदेशाकडून पुन्हा प्राप्त झाली आहे.
ब्रम्हदेशात या विधिला सम्रर्पण भावनेने जपणा~या आचार्यांच्या गुरुशिष्य परंपरेमुळे ही साधना आपल्या शुद्ध स्वरुपात कायम राहिली.या परंपरेचे विख्यात आचार्य सयाजी ऊ.बा. खीन यांनी इ.स. १९६९ साली श्री. सत्यनारायणजी गोयन्का यांना आचार्य पद सोपवले. त्यानंतर गृहस्थ तसेच भीक्षु संन्यासी मुनी वैगेरे गृहत्यागींना कल्याणमित्र श्री. सत्यनारायणजी गोयन्का यांच्या प्रयत्नांने केवळ भारतातच नवे तर ऎंशीहुन अधिक देशातही विपश्यना साधनेचा लाभ मिळु लागला आहे. मंगलदायी विपश्यना साधनेचा अभ्यास गंभीरतेने करण्यासाठी इगतपुरी येथे आश्रमाची स्थापना झाल्यानंतर मराठी भाषिक त्याचा लाभ मोठ्या संख्येने घेऊ लागले.
विपश्यना साधना दहा दिवसांच्या शीबिरात शिकवली जाते.ज्यांच्याकडे शारिरीक व मानसीक पात्रता आहे आणि ज्यांना ही साधना प्रामाणिकपणे शिकायची आहे त्या सर्वांना ह्या शिबिरात मुक्त प्रवेश दिला जातो. ह्या दहा दिवसात शिबिरार्थींना आश्रमाच्या परिसरात रहावे लागते व बाहेरच्या जगाशी असणारा सर्व प्रकारचा संबध तोडावा लागतो. त्यांना कोणत्याही प्रकारचे लिखाण किंवा वाचन करता येत नाही. आपले नेहमीचे धार्मीक व्रत वैकल्य किंवा जपजाप्य दहा दिवसांसाठी स्थगीत करायचे असते. आपल्या गुरुजींनी दिलेल्या सुचनांप्रमाणे काम करणे आवशय्क असते. दहा दिवसांसाठी त्यानां शिल पालनाच्या मुलभुत नियमांचे पालन करावे लागते. त्यात संपुर्ण ब्रह्मचर्य पाळायचे असते व सर्व प्रकारच्या मादक पदार्थांचे सेवन वर्ज्य असते. प्रशिक्षणार्थीनां पहिल्या नऊ दिवसांसाठी आपापसात पुर्णपणे मौन पाळ्णे आवश्यक असते. पण या काळात साधनेच्या अडिअडचणीसंबधी साधक आपल्या शीक्षकांशी किंवा व्यवस्थापकांशी संपर्क साधू शकतात.
प्रशिक्षणातील पहिल्या साडेतीन दिवसात साधकांना मनाच्या एकाग्रतेचा अभ्यास करायचा असतो. ही सर्व चवथ्या दिवशी शिकवल्या जाणा~या प्रमुख विपश्यना साधनेची पुर्वतयारीच असते. ह्या साधनेची प्रत्येक पायरी प्रत्येक दिवशी अशा प्रकारे शिकवली जाते कि शिबिराच्या शेवटच्या दिवसापर्यंत संपुर्ण साधनाविधिची रुपरेखा साधकांना शिकवुन होते.दहाव्या दिवशी सकाळी मौन सुटते. अशाप्रकारे साधकाला दहावा दिवस दॆनंदिन जिवनात प्रवेश करण्यासाठी संक्रमणकाळ म्हणून दिला जातो. अकराव्या दिवशी सकाळी प्रशिक्षणाची सांगता होते.
स्त्रोत
जगण्याची कला
विपश्यना साधना
(द आर्ट ऑफ लिविंग - पुस्तकाचे मराठी भाषांतर)
विपश्यना
- Details
- Hits: 8686
0
ध्यान
रेकी: तुम्हांला माहीत आहे का?
