
वडगाव शेरी,ता. २४ : पुणे
विपश्यना ध्यान केंद्र, स्वारगेट येथे नुकतेच एकदिवसीय आनापान ध्यान शिबिर पार पडले.
पुण्यातील २२० विद्दार्थिनींनी याचा लाभ घेतला. "नऊ ते सोळा वयोगटतील विद्दार्थ्यांसाठी या शिबिराचे आयोजन दरमहा पहिल्या रविवारी करण्यात येते. ही शिबिरे विनामुल्य घेतली जातात. जुन्या साधकांच्या दानावर सर्व कार्य चालते.
श्वासाच्या साह्राने मनाला एक्राग करण्याची ही साधना असून, यामुले मुलांची एक्रागता, स्मरणश्क्ती, बुध्दिमत्ता, आकलनश्क्ती वाढते," अशी माहिती पुणे विपश्यना ध्यान केंद्राचे प्रमुख दत्ता कोहिनकर यांनी दिली.
Source: www.esakal.com