Print
Hits: 6686

ध्यानसाधनेला सुरवात करताना सर्वप्रथम एक मेणबत्ती पेटवून घ्यावी (आपल्या आवडीनुसार सुगंधित), तुमच्या आवडीनुसार कोणत्याही जागी पाच ते दहा मिनिटे शांत बसावे. जास्त वेळ बसण्यासाठी किंवा विशिष्ट जागी बसण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करु नये. असे काही काळ करत राहण्याने, जळणा-या मेणबत्तीने किंवा त्या विशिष्ट सुगंधामुळे आपणास आराम व मनशांती मिळण्यास मदत होते. तसेच पुढील ध्यानसाधनेकरीता उपयुक्त माध्यम मिळत जाते.

जर आपण यापूर्वी कधीही ध्यान केले नसेल तर पहिल्या वेळेस मन हे विचारांची पंगत असल्याचे भासते. काही खोल श्वास घ्या आणि फक्त बसून रहा. आपल्या विचारांना थांबवण्याचा प्रयत्न करु नका. त्यांना आपल्या मार्गाने आपल्या मनात वाहू द्या. एका आठवड्यातच आपल्याला दिसून येईल की आपले विचार संथ झाले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत आपल्याला उतावळेपणा किंवा कंटाळवाणेपणा यादोन्ही भावना येऊ शकतात. पण काळजी करु नका. असे वाटणे सहाजिकच असते. हे फक्त पाच ते दहा मिनिटेच करावे.

आपल्याला याक्रियेत आराम मिळाल्यानंतर आपणास झोप येऊ शकते. हेही सहाजिकच असते. जस जसे तुम्ही प्रगती करत जाल तस तसे तुम्हाला अभ्यासानंतर जागे राहण्याची सवय होईल. जर अभ्यासानंतर आपणास झोप येणार नसेल तर पुन्हा कार्यरत होण्यासाठी दहा मिनिटांचा वेळ द्या.