चैतन्याच्या दिशेने प्रवास
या ठिकाणी पोहचण्याआधी आपण आपल्या आयुष्यात संथ गतीने व स्थिरपणे प्रवास केला आहे. तुम्ही त्याठिकाणी अचानकपणे किंवा एकदम पोहचत नाहीत. त्याचप्रमाणे जर आपणास चैतन्याच्या दिशेने मार्गक्रमण करायचे असेल तर हे काही दिवसात किंवा आठवड्यात साध्य होणार नाही. असेच काही पहिल्या पातळीतून दुस-या पातळीत जातानाही असेच अनुभव येतील. शेवटच्या निर्णायक ठिकाणी पोहचण्याआगोदर आपल्याला वेगवेगळ्या पातळ्या गाठायच्या आहेत.
चैतन्याकडे वाटचाल करताना सर्वप्रथम आपला भूतकाळ मागेच ठेवावा. सकारात्मक दृष्टिकोन, श्रद्धा व आपले आयुष्य बदण्याच्या सबळ इच्छाशक्तीची आपल्याला आवश्यक्ता आहे. बाकी सर्वकाही मागे सोडून द्या. मगच आपण नव्या क्षितिजाकडे हळुहळू पण नक्कीच पोहचणार आहोत. या मार्गक्रमणात आपल्याला काही समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. पण आपले लक्ष्य ठराविक अंतरावर सिमित झाल्याचे आपल्याला दिवसा अखेर कळून येईल. पण जर आपण आपल्या प्रयत्नात सातत्य राखले तरच.
आपण इतरांचे हे बोलणे ऐकले असेलच की,"मी ध्यानसाधनेचा बराच अभ्यास केला पण मी फार काळ ते करु शकत नाही." असे लोक असा विचार करतात की ध्यान करणे म्हणजे पूर्णतः आपले मन शांत करणे. मन शांत करणे ही क्रीया जेव्हा खूप वेळा करीता ध्यान करता तेव्हाच शक्य होते. ध्यानसाधनेच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यातल्या काही पद्धती निष्क्रिय असतात तर काही सक्रिय असतात. सक्रिय व निष्क्रिय हा भाग शाररिक दृष्ट्या नसतो तर ध्यानाच्या कालावधीत अनुसरायचा असतो व ते आपापल्या विभागाचे नेतृत्व करतात. म्हणूनच आपल्याला सोईस्कर व लाभदायक आशी पद्धत शोधून काढा.
ध्यानसाधना एक कला आणि विज्ञान
- Details
- Hits: 5957
9
ध्यान
रेकी: तुम्हांला माहीत आहे का?
