Print
Hits: 34967

सामान्य सर्दी

कोरड्या आणि चोंदलेल्या नाकासाठी साध्या क्षारयुक्त किंवा मीठ घातलेल्या पाण्याचे थेंब नाकात घालावेत. १/४ टेबलस्पून मीठ चार मिली पाण्यात घालून हे थेंब तयार करावेत.

थोड्या-थोड्या दिवसांनी ताजे मिश्रण बनवावे आणि ते फ्रीजमध्ये ठेवावे. स्वच्छ ड्रॉपरने रोज ३ ते ४ वेळा दोन्ही नाकपुड्यांमध्ये २ थेंब घालावेत.

डॉक्टरांच्या सल्लाशिवाय औषधी युक्त ड्रॉप्स वापरु नयेत, कारण याच्या जास्त वापराने नाकाच्या श्लेष्मल आवरणाचा दाह होतो, आणि नाक सतत चोंदते.

थोडे लसणाचे तेल काद्यांच्या रसात मिसळून ते एक कप पाण्यात मिसळावे आणि त्यांचे थेंब नाकात घालावेत.

आल्याचा चहा किंवा १ चहाचा चमचा आल्याचा रस समभाग मधात घेतल्यास फायदा होतो.

कफ/खोकला

पोटदुखी

अतिसार/हगवण

घरीच तयार केलेले खालील मिश्रण द्यावे (उकळून थंड केलेले पाणी - १ लिटर, मीठ (बारीक) - ३/४ चहाचा चमचा, साखर - ५ चहाचे चमचे, लिंबू - १/३) या मिश्रणा ऐवजी मोसंब्याचा रस किंवा लस्सी, सौम्य चहा हे देखील वरील मिश्रणा ऐवजी घेऊ शकतात.

जर लहान मुलांनी घट्ट पदार्थांनी मागणी केली तर त्यांना भात, केळी, उकडून कुस्करलेले बटाटे, दही, डाळींचे सूप किंवा खिचडी द्यावी. ताप १०४ डिग्री फॅ. च्या वर गेला असेल किंवा कमी तापात देखील मूल अस्वस्थ असेल तर नळाचे पाणी घेऊन त्याने स्पंजिंग करावे. जर खूप थंड पाणी वापरले तर त्याने थंडी भरुन येईलआणि ताप कमी होण्यास मदत होणार नाही.

शरीरातील जास्त उष्णता खेचून घेणे हा स्पंजिंगचा फायदा आहे. मुलाला पंखा सुरु ठेवून थंड ठिकाणी ठेवावे. त्याचे कपडे काढून नळाच्या पाण्यात टॉवेल भिजवून तो पिळून घ्यावा आणि मुलाच्या शरीराभोवती गुंडाळावा. टॉवेल गरम किंवा उबदार झाला की काढून घ्यावा आणि ताप कमी होईपर्यंत हे सारखे करावे.

स्पंजिंग केल्याने सर्दी होते हा एक गैरसमज आहे. काही प्रमाणात तो खराही आहे पण जास्त तापाचे गंभीर परिणाम होऊ शकतात. सर्दी झाली तर ती सहजपणे कमी करता येते.

बध्दकोष्ठता

वाबं/पेटका/गोळे येणे

दमा

मुळव्याध

भाजणे

मुरुमे/तारुण्य पीटिका

लिम्बाचा रस आणि काकडीची पाने किंवा काकडीच्या चकत्या ज्या मुख लेपनात (फ़ेसपाक) लवगं आहे असा लेप किंवा मेथिची पाने रात्रभर लेपुन ठेवावीत व सकाळी चेहरा स्वच्छ धुवावा.

संत्राची साल पाण्यात भिजवुन संबध चेहरावर फ़िरवावी, त्याचा उपयोग होतो. दिवसभर चेहरावर तजेलता येण्यासाठी किमान एक लिटर पाणी प्यावे.

कुरुप

तोंड येणे किंवा तोंडात व्रण उठणे.

कांजण्यांचे व्रण किंवा डाग

नाकातुन रक्त येणे

दातदुखी

दुखणारया दाताच्या रेषेत गालावरुन बर्फाची पुरचुंडी फिरवावी त्यामुळे दुखणं थोडं बधिर होतं. जर दातदुखी जंतू संसर्गाने झाली असेल आणि सूज आली असेल तर हा उपाय विशेष फायदेशीर ठरतो.

पण जर किडीमुळे दातदुखी झाली नसेल तर वरील उपाय त्रासदायक ठरु शकतो. अशा वेळी गरम पाण्याची बाटली/पिशवी वापरावी.

दातांना कीड असेल तर टूथपिक ने किडलेला भाग स्वच्छ करावा आणि तिथे लवंगाच्या तेलाचा बोळा भरुन ठेवावी.

१ चमचा मीठ अर्ध्या लिटर पाण्यात घालून त्या द्रावणाने गुळ्णा करून तोंड स्वच्छ ठेवावे.

लचक भरणे

लचक भरलेल्या भागास संपूर्ण विश्रांती द्यावी आणि कोणत्याही शारीरिक हालचालींपासून दूर ठेवावे.

सूज कमी होण्यासाठी

उचक्या

केसांच्या समस्या: कोंडा

केसांच्या समस्या: केस गळती