आरोग्य.कॉम
  • मुखपृष्ठ
  • पर्यायी उपचार पद्धती
    • आयुर्वेद
    • होमिओपॅथी
    • निसर्गोपचार
    • अ‍ॅक्युप्रेशर
    • अ‍ॅक्युपंक्चर
    • अरोमा थेरपी
    • बॅच फ्लॉवर औषधे
    • घरगुती उपाय
    • मसाज
    • योग
    • ध्यान
    • रेकी
    • संमोहन
    • बॉडीवर्क
  • आजार आणि रोग
    • सामान्य आजार
    • संसर्गजन्य आजार
    • विशिष्ट आजार
  • कुटुंबाचे आरोग्य
    • पुरूषांचे आरोग्य
    • वृध्दांचे आरोग्य
    • महिलांचे आरोग्य
    • मुलांचे आरोग्य
    • किशोर आरोग्य
    • प्रथमोपचार
    • तंदुरूस्ती
    • पोषक पदार्थ आणि अन्न
    • पाळीव प्राणी
  • आरोग्य संपदा
    • वैद्यकीय करियर
    • ग्रामिण आरोग्य
    • हॉस्पिटल्स
    • रुग्णहक्क समिती
    • आरोग्यासाठी टिप्स
  • विमा
    • आरोग्य विमा
    • वैद्यकीय नैतिकता
    • टेलीमेडिसीन
    • इच्छामरण
  • लैंगिकता
    • लैंगिकता म्हणजे काय?
    • लैंगिक शिक्षण
    • गर्भधारणा
    • विवाह
    • कामजीवन आणि अपंगत्व
    • मासिकपाळी
    • ट्रान्ससेक्शुअ‍ॅलिझम
    • शरीरभाषा
    • लैंगिकतेपार
    • फेटिशीझम
    • लैंगिक संवेदना गोठणे
  • स्व-मदतगट
    • एपिलेप्सी
    • स्किझोफ्रेनिया
    • पार्किन्सन्स
    • व्यसनमुक्ती
    • स्थुलता
    • कर्करोग
    • नैराश्य
    • अपंगत्व
    • मुत्रपिंड स्व-मदतगट
    • सेतू
    • कोड - पांढरे डाग
    • सहचरी मदत गट
Aarogya.com
English | ગુજરાતી | नोंदणी | लॉग-इन
  • मुख्यपृष्ठ
  • पर्यायी उपचार पद्धती
  • घरगुती उपाय
  • सामान्य आजार

सामान्य आजार

  • Print
  • Email
Details
Hits: 35372

सामान्य सर्दी

कोरड्या आणि चोंदलेल्या नाकासाठी साध्या क्षारयुक्त किंवा मीठ घातलेल्या पाण्याचे थेंब नाकात घालावेत. १/४ टेबलस्पून मीठ चार मिली पाण्यात घालून हे थेंब तयार करावेत.

थोड्या-थोड्या दिवसांनी ताजे मिश्रण बनवावे आणि ते फ्रीजमध्ये ठेवावे. स्वच्छ ड्रॉपरने रोज ३ ते ४ वेळा दोन्ही नाकपुड्यांमध्ये २ थेंब घालावेत.

डॉक्टरांच्या सल्लाशिवाय औषधी युक्त ड्रॉप्स वापरु नयेत, कारण याच्या जास्त वापराने नाकाच्या श्लेष्मल आवरणाचा दाह होतो, आणि नाक सतत चोंदते.

थोडे लसणाचे तेल काद्यांच्या रसात मिसळून ते एक कप पाण्यात मिसळावे आणि त्यांचे थेंब नाकात घालावेत.

आल्याचा चहा किंवा १ चहाचा चमचा आल्याचा रस समभाग मधात घेतल्यास फायदा होतो.

कफ/खोकला

  • मध आणि मोसंब्याचा रस समप्रमाणात मिसळावा.
  • एक चहाचा चमचा मधात थोडी ब्रॅन्डी मिसळावी.
  • एक चहाचा चमचा मधात लसणीच्या रसाचे काही थेंब मिसळावेत.
  • एक चहाचा चमचा मधात एक कप द्रक्षाचा रस मिसळावा हे मिश्रण नेहेमी उपयोगी पडते.
  • एक चहाचा चमचा कांद्याच्या रसात एक चहाचा चमचा मध मिसळून हे मिश्रण ३ ते ४ तास तसेच ठेवून नंतर द्यावे. हे उत्तम कफ सिरप आहे.
  • बदाम रात्रभर भिजत घालून त्याची साल काढावी. या बदामाची पेस्ट थोडे लोणी आणि साखर यांच्याबरोबर घेतल्यास कोरड्या कफात उपयुक्त ठरते.
  • साखर खाल्ल्याने मोठ्या मुलांमध्ये कफ कमी होऊ शकतो.

पोटदुखी

  • मुलाला/मुलीला वर धरावे किंवा त्याला/तिला पाठीवर झोपवून पाय पोटापाशी दुमडुन हळूच पोटावर दबावे.
  • बेंबीच्या भोवती हिंगाचा पातळसा थर लावावा.
  • बेंबीच्या भोवती टर्पेंटाइन लावावे.

अतिसार/हगवण

घरीच तयार केलेले खालील मिश्रण द्यावे (उकळून थंड केलेले पाणी - १ लिटर, मीठ (बारीक) - ३/४ चहाचा चमचा, साखर - ५ चहाचे चमचे, लिंबू - १/३) या मिश्रणा ऐवजी मोसंब्याचा रस किंवा लस्सी, सौम्य चहा हे देखील वरील मिश्रणा ऐवजी घेऊ शकतात.

जर लहान मुलांनी घट्ट पदार्थांनी मागणी केली तर त्यांना भात, केळी, उकडून कुस्करलेले बटाटे, दही, डाळींचे सूप किंवा खिचडी द्यावी. ताप १०४ डिग्री फॅ. च्या वर गेला असेल किंवा कमी तापात देखील मूल अस्वस्थ असेल तर नळाचे पाणी घेऊन त्याने स्पंजिंग करावे. जर खूप थंड पाणी वापरले तर त्याने थंडी भरुन येईलआणि ताप कमी होण्यास मदत होणार नाही.

शरीरातील जास्त उष्णता खेचून घेणे हा स्पंजिंगचा फायदा आहे. मुलाला पंखा सुरु ठेवून थंड ठिकाणी ठेवावे. त्याचे कपडे काढून नळाच्या पाण्यात टॉवेल भिजवून तो पिळून घ्यावा आणि मुलाच्या शरीराभोवती गुंडाळावा. टॉवेल गरम किंवा उबदार झाला की काढून घ्यावा आणि ताप कमी होईपर्यंत हे सारखे करावे.

स्पंजिंग केल्याने सर्दी होते हा एक गैरसमज आहे. काही प्रमाणात तो खराही आहे पण जास्त तापाचे गंभीर परिणाम होऊ शकतात. सर्दी झाली तर ती सहजपणे कमी करता येते.

बध्दकोष्ठता

  • एक (टेबलस्पून) मोठा चमचा मक्याचे सरबतात/रसात ८अंश पाणी घालावे.
  • दिवसातून दोन वेळा दूध घ्यावे आणि त्यात थोडी साखर किंवा मध घालावे. सगळ्या फळांमध्ये बेलफळ उत्तम सारक आहे. हे आतडे स्वच्छ ठेवते. पेरु बियांसह खाल्लामुळे तंतूयुक्त पदार्थांचे फायदे मिळतात. आहारात फळांचा समावेश जास्त असावा. पिअर्स, द्राक्ष, संत्र्याचा रस आणि पपई ही फळेदेखिल उपयुक्त आहेत. लहान किंवा मोठ्या मुलांना कोंड्याचे cereal देतात.

वाबं/पेटका/गोळे येणे

  • खडे मिठाची चिमूट जिभेवर ठेवल्यास वाबं आल्यास ती कमी करण्यात मदत होते.
  • आहारात जास्त मीठ, मोसंब्याचा रसात बारीक मीठ घालून तो घेणे किंवा आहारात कोशिंबीर, सॅलेड जास्त मीठ घालून खाणे.

दमा

  • १/४ कप कांद्याचा रस, १ मोठा चमचा (टेबलस्पून) मध आणि १/८ काळी मिरी यांचे मिश्रण द्यावे.
  • आले आणि यांचा काढा तयार करुन तो १/२ मोठा चमचा घेऊन एक कप पाण्यात लसणाचा रस काढावा. कोमट पाण्याचे १०-१५ थेंब त्यात घालून द्यावे.

मुळव्याध

  • पोटात घ्यावयाचे औषध: १/२ चमचा आल्याचा रस, १/२ लिंबाचा रस, एक चमचा मध आणि १/२ चमचा पुदिन्याची पाने एकत्र मिसळून घ्यावीत.
  • सुके अंजीर भिजत घालून, त्यात थोडेसे दूध घालून त्याचा लेप तयार करावा. तो लेप मुळव्याधीच्या जागी लेपल्याने तेथील त्रास कमी होतो.
  • वाटलेला पांढरा मुळा आणि मध यांच्या मिश्रणाचे नियमित सेवनाने फरक वाटू लागतो.
  • सुक्या आणि वाहत्या मुळव्याधींसाठी कांदा हे नामी औषध आहे. कांद्याची साले काढून ती भाजावीत आणि वाटून त्यांचा लेप लावावा उत्तम फायदा करुन देतो.

भाजणे

  • सगळे घट्ट कपडे कापून दूर करावेत. पण जर भाजलेल्या जागी कपडे चिकटले असतील तर ते ओढून सैल करण्याचा प्रयत्न करु नये.
  • भाजलेली जागा दूषित होऊ नये आणि रुग्णाला लॉन्ड्रीमध्ये धुतलेल्या स्वच्छ कापडाने झाकावे.
  • बर्फाची पट्टी किंवा बर्फाच्या पाण्यात बुडविलेले कापड अंगावर ठेवावे आणि ते सारखे बदलावे.
  • उकडलेल्या बटाट्याची साले भाजलेल्या जागी लावावी.

मुरुमे/तारुण्य पीटिका

लिम्बाचा रस आणि काकडीची पाने किंवा काकडीच्या चकत्या ज्या मुख लेपनात (फ़ेसपाक) लवगं आहे असा लेप किंवा मेथिची पाने रात्रभर लेपुन ठेवावीत व सकाळी चेहरा स्वच्छ धुवावा.

संत्राची साल पाण्यात भिजवुन संबध चेहरावर फ़िरवावी, त्याचा उपयोग होतो. दिवसभर चेहरावर तजेलता येण्यासाठी किमान एक लिटर पाणी प्यावे.

कुरुप

  • घट्ट झालेल्या त्वचेवर रात्रभर लिंबाची चकती ठेवावी.
  • मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलात ३ ते ४ थेंब ज्येष्ठमधच्या काड्या दळुन एकत्र कराव्यात.
  • पपई चा रस लावावा.
  • हिरव्या अंजीराच्या दुधाने आराम मिळतो.

तोंड येणे किंवा तोंडात व्रण उठणे.

  • पेपर मिंट चे तेल (पुदिना तेल) त्या जागी लावावे. त्यामधे थोडी बधिरता देण्याची क्षमता असते.
  • थोडेसे खोबरेल तेल व्रणांना हलक्या हाताने लावावे. किसलेले ओले खोबरे चावुन चावुन खाल्याने फ़रक पडतो.
  • विड्यासाठी वापरला जाणारा सुका कातही जंतुमुक्त ठेबण्यास मदत करतो.

कांजण्यांचे व्रण किंवा डाग

  • चंदनाचे तेल (लेप नव्हे) कांजिण्या आलेल्या पहिल्या दिवसापासून ते खपल्या पडेपर्यंत रोज लावावे, म्हणजे काजिंण्याचे डाग राहणार नाहित.
  • व्हिटामिन ई तेलाच्या वापराने कांजण्या बऱ्या होण्यास मदत होते.
  • अंगाला मध चोळल्यास कांजण्या बऱ्या होण्यास मदत होते.
  • अंगाला सुटणारी खाज कमी होण्यासाठी कोमट पाण्यात कडुलिंबाची पाने घालुन स्नान करावे.
  • ओटमिलने स्नान करणे हि, खाज दुरकरण्यासाठी नैसर्गिक पध्दत मानली गेली आहे.

नाकातुन रक्त येणे

  • दोन्ही नाकपुड्या, नाकाच्या हाडाचे दोन्ही बाजुनी दाब देत अंगठा आणि र्तजनीने दाबून धराव्यात.
  • मुल अशावेळी सरळ बसवावे. पण त्याचे डोके मात्र मागच्या बाजुला असावे, म्हणजे रक्त परत घशात जात नाही. कीमान दोन मिनीटे तरी नाकपुड्या दाबुन धराव्यात.
  • एंरडेल तेलात कापसाचे बोळे बुडवुन नाकपुड्यात ठेवावी.
  • बर्फ़ाची पुरचुंडी नाकाच्या शेंड्यावर धरावी.

दातदुखी

दुखणारया दाताच्या रेषेत गालावरुन बर्फाची पुरचुंडी फिरवावी त्यामुळे दुखणं थोडं बधिर होतं. जर दातदुखी जंतू संसर्गाने झाली असेल आणि सूज आली असेल तर हा उपाय विशेष फायदेशीर ठरतो.

पण जर किडीमुळे दातदुखी झाली नसेल तर वरील उपाय त्रासदायक ठरु शकतो. अशा वेळी गरम पाण्याची बाटली/पिशवी वापरावी.

दातांना कीड असेल तर टूथपिक ने किडलेला भाग स्वच्छ करावा आणि तिथे लवंगाच्या तेलाचा बोळा भरुन ठेवावी.

१ चमचा मीठ अर्ध्या लिटर पाण्यात घालून त्या द्रावणाने गुळ्णा करून तोंड स्वच्छ ठेवावे.

लचक भरणे

लचक भरलेल्या भागास संपूर्ण विश्रांती द्यावी आणि कोणत्याही शारीरिक हालचालींपासून दूर ठेवावे.

सूज कमी होण्यासाठी

  • लचक भरलेला सांधा थंड पाण्यात बुडवून ठेवावा.
  • बर्फाच्या पाण्याचे फडके गुंडाळावे. बर्फाच्या पुरचुंडीचा वापर करावा. लचक भरलेला सांधा शरीराच्या पातळीपेक्षा उंचावर ठेवावा. वेदनाशामक औषध घ्यावे.

उचक्या

  • मुलाला खडीसाखर चोखायला द्यावी.
  • चमच्याच्या किंवा तत्सम गोष्टींचा वापर करुन पडजिभेला थोडासा दाब द्यावा. अगदी सावकाशपणे, घोट घोट घेत मुलाला पाणी पिवून द्यावे. काहीजण या पाण्यात चिमूटभर खाण्याचा सोडा मिसळतात, त्याने अधिक जलद फरक पडतो.
  • मोठ्या मुलांच्या बाबतीत, शक्य असेल तर थोडा वेळ श्वास रोखून ठेवायला सांगावा. किंवा पडजिभेवर जोर येईपर्यंत जीभ बाहेर काढून ठेवण्यास सांगावे.

केसांच्या समस्या: कोंडा

  • मेथीच्या पुडीला पाण्यात घालून लेप तयार करावा, आणि सबंध डोक्यावर लावावा. एक तासानंतर साबणाने डोके धुवून टाकावे.
  • केस धुताना वारंवार लिंबाचा रस वापरल्यास कोंडा कमी होण्यास फायदा होतो. कच्च्या बीटाची मुळे पाण्यात घालून पाणी उकळावे आणि त्या पाण्याने रोज रात्री डोक्याला मसाज करावी.
  • दोन-तीन दिवसाचे शिळे (आबंट दही), थोडासा लिंबाचा रस, व्हिनिगर आणि आवळ्याचा रस यांच्या वापरानेही कोंडा कमी होऊ शकतो.

केसांच्या समस्या: केस गळती

  • रात्री झोपताना ऑलीव्ह ऑईल डोक्याला चोळून लावावे आणि दुसरया दिवशी सकाळी डोके स्वच्छ धुवून टाकण्याचा खूप फायदा होतो.
  • डोक्याच्या ज्या भागावरील केस गेले असतील त्या भागावर कांदा लालसर होईपर्यंत घासावा. त्यानंतर लगेच त्या भागावर मधाचा लेप द्यावा.
  • सुकलेल्या आवळ्याचे तुकडे खोबरेल तेलात टाकून तेल चांगले उकळावे. हे असे बनलेले आवळ्याचे तेल उत्तम केशवर्धक तेल आहे.
  • नारळाचे दूध संपूर्ण डोक्याला लावून, केसाच्या मुळांपर्यंत मसाज करुन जिरवावे हा सुध्दा केस गळतीवरचा नामी उपाय आहे.
  • मोगरयाची पानं, मोहरीच्या तेलात काळी होईपर्यंत तळावीत. ते मिश्रण गाळून घ्यावे. या तेलाने नियमित डोक्याला मसाज केल्यास उपयोग होतो.
  • मोसंबीच्या बिया आणि काळी मिरी यांची एकत्र पूड करावी. त्याचा लेप केस गेलेल्या भागात लावणे उपयोगी ठरते.
  • केस गळतीवरचा सर्वोत्तम उपाय म्हणजे थंड पाण्याने केस धुवून अत्यंत जोराने केसांना मुळापर्यंत बोटांनी घासणे हाच आहे.

68

घरगुती उपाय

  • चावे/दंश
  • उपचार
  • नैसर्गिक उपाय
  • सामान्य आजार
  • शतावरी
  • शिकेकई

रेकी: तुम्हांला माहीत आहे का?

रेकी: तुम्हांला माहीत आहे का? रेकीच्या रोज सरावाने शरीर, मन, भावना, अध्यात्मिक पातळीवर चांगला परीणाम होतो. पुढे वाचा…

Swine Flu

National Award for Outstanding achievement by a Non-Professional - Tushar Sampat

Introducing Digital Practice for Doctors & Healthcare professionals

विशिष्ट आजार
सामान्य आजार

आरोग्य नेटवर्क

आरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.

» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Pune Aarogya
Digital Media Dedicated to Healthcare of Punekars

वेबसाईटशी लिंक करा

aarogya logo

ईमेल कोड

आमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या

 आरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.

स्वास्थ्य साधने

  • हेल्थ डिरेक्टरी
  • संदेश बोर्ड
  • हेल्थ कॅल्क्युलेटर

आरोग्य.कॉम विषयी

आरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.

अधिक वाचा...

प्रस्ताव

हे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू

अधिक वाचा...

सदस्यांच्या प्रतिक्रया

“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.!”

  • आमच्या विषयी
  • प्रतिक्रिया
  • गोपनीयता नीति
  • साइट मॅप
  • संपर्क
  • मित्रांशी संपर्क साधा

कॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.