शिकेकई म्हणजे शास्त्रीय भाषेत अकेशिया कॉन्सिन्ना, एक नैसर्गिक शाम्पू.
सध्या मध्यवयीन असलेल्या स्त्रीयांना त्यांच्या लहानपणाच्या आठवणी निघाल्या की आठवते ‘शिकेकई’. आई-मावशी किंवा आजी शिकेकई कशा तयार करायच्या, तेव्हा केस धुण्याचा प्रोग्रॅम कसा असायचा ते त्यांना आठवते. आणि नहण्यापूर्वी शिकेकई लोखंडी पातेल्यात उकळून घेऊन आई कशी खसा खसा नहायला घालायची, आपण कसे रडायचो ते त्यांना आठवते. तेव्हा काही मैत्रिणी शाम्पूनी नहायच्या, त्यांचा हेवा वाटायचा. आज खूप वर्षांनी मात्र शिकेकईची आठवण आल्यावर ती वापराविशी वाटते. शेवटी ’जुनं ते सोनं’ हेच खरं असं वाटतं. काय बरं कारण असावं त्याचं?
शिकेकईत आहेतच असे अनेक गूण…
शिकेकई - फ़्रुट फॉर हेअर, म्हणजे केसांचे फळ.
गेली अनेक शतके भारतात केश-संभारासाठी वापरली जाणारी वनस्पती.
भारतात शेकडो वर्ष चालत आलेली ही परंपरा आहे. शिकेकई, ह्या औषधी वनस्पतीची मोठ्याप्रमाणात लागवड भारतभरात आणि पूर्व अशियात सापडते. शिकेकईची फळे वाळवून दळून, त्याची पावडर वापरली जाते. किंवा शिकेकईचा ओला पाला पट्यावर वाटून तो केसांसाठी वापरला जातो.
शिकेकईचा केस दणकट व्हायला, तजेलदार व्हायला खूपच मदत होते. ही वनस्पती उष्ण आणि कोरड्या कटिबंधात वाढणारी आहे. केसामधे कोंडा न होण्यासाठी शिकेकईचा खूपच उपयोग होतो. आजच्या युगात आपण इतके साबण शाम्पू विकत घेत असतो, पण शिकेकई हे एक नैसर्गिक बॉडी केअर आणि हेअर केअर प्रॉडक्टच आहे. त्याची सर कोणत्याही शाम्पू कंडिशनरला नाही.
शिकेकईमुळे केस काळे रहातात. शाम्पू वापरल्याचे दुष्परिणाम म्हणजे मानव निर्मित रसायना मुळे केस लवकर पांढरे होणे, केस गळणे इत्यादि. शिकेकई मधे नैसर्गिक तेल, नैसर्गिक शाम्पू आणि नैसर्गिक कंडिशनर असते.
शिकेकई मधे खूप प्रमाणात सॅपोनिअन हे रसायन आढळते. सॅपोनियन हे नैसर्गिक द्रव्य आहे. ह्या द्रव्यामुळे फेस निर्माण होतो. त्यामधे स्वच्छतेला हातभार लावतील असे अंश असतात. हे रसायन नंतर साबण उत्पादनासाठी वापरले जाते.
शिकेकईचा वापर उन्हाळ्यात खूपच प्रभावी ठरतो. त्यामुळे डोक्याला एक थंडाई येते. शिकेकईच्या बरोबरीनी नागरमुथा, वाळलेली संत्राची साले, वाळवलेली मेंदीची पाने, ह्या गोष्टीही वाटल्या जातात. शिकेकई वापरायची असल्यास दळून आणलेली शिकेकई आदल्या दिवशी रात्रीच लोखंडाच्या भांड्यात भिजवून ठेवतात. सकाळी नहाण्यापूर्वी ती भांड्यातील शिकेकई उकळून घेतात. म्हणजे त्याचे सर्व सत्व एकजीव होते आणि त्याचा केसांवर खूप छान परिणाम होतो.
रीठा आणि शिकेकाईचे सत्व एकजीव करून अजूनही खेड्यापाड्यात कपडे धुण्यासाठीही वापरले जाते. अशी अत्यंत गुणकारी शिकेकई निर्हेतुकपणे आपल्याला खूप काही देऊन जाते.
शिकेकई
- Details
- Hits: 13919
27
घरगुती उपाय
रेकी: तुम्हांला माहीत आहे का?
