मुंग्या किंवा डास चावल्यास
- साबणाच्या पाण्याने तो भाग स्वच्छ धुवावा.
- खाण्याचा सोडा आणि पाण्याचा लेप करुन त्या ठिकाणी लावावा.
- पांढरे व्हिनिगर लावल्याने अनेकदा उपयोग होतो.
- सुखद वाटण्यासाठी कॅलेमाइन लोशन लावावे.
घरात झोपण्यापूर्वी एक तास कडुनिंबाच्या पानांचा धूर केल्यास डास घराबाहेर जातात.
मधमाशी/गांधीलमाशी वा तत्सम कीटक चावल्यास
- चावा घेतलेल्या भागावर थंड पाणी ओतावे त्यामुळे विष पसरण्याची क्रिया मंदावते आणि वेदना कमी होतात.
- पर्यायी म्हणजे त्या भागावर बर्फाची पुरचुंडी ठेवावी.
- थोडेसे मीठ आणि पांढरे व्हिनिगर ताबडतोब लाव
- कांद्याचा रस लावल्यानेही बरे वाटते.
- खाज आणि आग कमी होण्यासाठी कॅलेमाइन लोशन लावावे.
सर्पदंश
- विश्रांती
- बरा होईल याची ग्वाही
- चावलेल्या भागाला स्थिर ठेवणे आणि अशा पध्दतीने ठेवणे की विष भिनण्याची गती कमी होईल.
- त्यानंतर खालील उपाय करावेत.
जखम ह्रदयाच्या पातळीपेक्षा खाली ठेवावी. जखमेचा भाग स्वच्छ पुसून घ्यावा. जखमेच्या वरच्या बाजूला २ ते ४ इंचाचे क्रेप बँडेज, रुमाल किंवा कापड घट्ट बांधावे. कोणत्याही सांध्याला, डोक्याला, वा कण्याला बांधू नये. जखम स्वच्छ पाण्याने धुवावी. आपण जर अगदी गावापासून दूर असाल तर मूत्राने/वा लाळेनेही जखम धुवावयास हरकत नाही.
खेकडा/विंचू दंश
- जखमेच्या वरच्या बाजूला बँडेज घट्ट बांधावे व पाच दहा मिनिटांनी काढून टाकावे.
- विष भिनू नये म्हणून जखमेच्या आसपास बर्फाची पुरचुंडी फिरवावी. त्याचा उद्देश किमान दोन तास जखम थंड ठेवणे हा असतो.