Print
Hits: 13643

मूत्रोत्सर्जनास उत्तेजन देणाऱ्या औषधांमध्ये शरीरातील पोटॅशियम दूर करण्याचे गुणधर्म असतात, जे की शरीराला अतिशय आवश्यक आहे. म्हणून अशी औषधे होणारयांनी केळी, ताज्या भाज्या, ज्यात पोटॅशियम जास्त प्रमाणात असते, त्याचे सेवन करावे. मूत्रोत्सर्जन-मलोत्सर्जन व्यवस्थित व्हावे म्हणून पाणी भरपूर प्रमाणात प्यावे.

Echinacea, Goldenseal आणि लसूण यासारखे बॅक्टेरिया प्रतिबंधक आणि सूज न येऊ देण्याचे गुणधर्म असणारे औषधी झाडांची औषधे वापरावीत त्यामुळे संसर्ग दूर होतो.

रोजच्या आहारात जीवनसत्वे आणि खनिजद्रव्यांनी भरपूर असे पदार्थ घ्यावेत. यात ए, सी, ई जीवनसत्वे, बीटा-कॅरोटीन आणि सेलेनियम असावे. जर रोगाची लक्षणे असतील तर ६० mg झिंक पिकोलिनेट घ्यावे अन्यथा ३० mg पुरेसे आहे.

क्रॅनबेरीच्या रसात मूत्राशयातील बॅक्टेरिया नाश करण्याचे गुणधर्म असतात. कूनबेरीच्या रसामुळे मूत्राशयातून प्रोस्टेट ग्रंथीमध्ये किंवा प्रोस्टेट ग्रंथीमधून मूत्राशयात पसरणाऱ्या संसर्गास अटकाव होण्यास मदत होते. रस म्हणून किंवा टॅबलेटस म्हणून घेऊ शकतो. रोज एक टॅबलेट तीन वेळा घ्यावी.

जलचिकित्सा किंवा हायड्रोथेरपी प्रोस्टेट ग्रंथीमधील वितरण वाढविते आणि मूत्रमार्ग मोकळा करते. आपण सहन करू शकाल इतक्या गरम पाण्यात (टबात) १५-३० मिनिटे बसावे. गरम-थंड पाण्याने आलटून-पालटून स्नान करावे, ते देखील फायदेशीर ठरते. प्रोस्टेट ग्रंथीच्या भागात थंड आणि गरम पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. जेव्हा तीव्र संसर्ग किंवा दाह असेल तेव्हा गरम पट्ट्या वापरु नयेत. हे लक्षात ठेवावे.

आरामात पडून तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. तणावाचे व्यवस्थापन करण्याचे तंत्र शिका आणि व्यायाम करा. Valerian, cranarptark, आणि sculliap यांसारखे स्नायू शिथिल करणारे किंवा स्नायूंना आराम देणारे हर्बस वापरा.

सौम्य आहार घ्या. आहारात संपूर्ण धान्य, उकडलेल्या भाज्या, ताजी फळे, हर्बल चहा आणि काढे/अर्क घ्यावेत. Saw palnetto आणि सायबेरीयन जिनसेंग हे पुरुषांच्या पुनरुत्पादन संस्थेसाठी उपयुक्त ठरतात, बुचु, saw palnetto आणि pipsissewa यात मूत्रसंस्थेसाठी आणि जननसंस्थेसाठी आणि जननसंस्थेसाठी बलवर्धक गुणधर्म आहेत तसेच यांचा कोणताही रोग बरा करण्याची आणि सूक्ष्म जीवाणूंचा नाश करण्याची शक्ती यात आहे. Couch Grass, कलिंगडाच्या बिया आणि Pipsissewa ही नैसर्गिक मूत्रोत्सर्जनास उत्तेजन देणारी औषधी आहे तसेच इतर सुरक्षित पध्दतींना मदत करते. Echinacea आणि सायवेरीयन जिनसेंग संसर्गास विरोध करण्याची शक्ती वाढवितात त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. Conctrey, couch graass vkf.k Marshmallew यात असणाऱ्या दाहशामक गुणधर्मामुळे दाह शांत करण्यास आणि सुरक्षित करण्यास याची मदत होते.