सदाफुली (Cathatanthus roseus)
वर्णन

एक मीटर सरळ वाढणारी औषधी, पाने अंडाकृती संमुख, फुले अक्षकोनात दोन किंवा तीनच्या समूहात, दलपुंज पांढरी किंवा गुलाबी असलेले, एक जातीत दलपुंज पांढरे किंवा खालच्या भागावर गुलाबी छटा असलेले फळे पुष्कळ बिया असलेली पुटक प्रकारची.
वितरण
मूलत: हे झाड मादागास्करचे आहे, पण दोन्ही गोलार्धात, उष्णकटिंबंधात नैसर्गिक अवस्थेत सापडते. ते लावले जाते व तेथूनच नैसर्गिक अवस्थेत उगवायला सुरवात होते.
औषधी गुणधर्म
या झाडाची मुळे औषधी असतात. आधी या औषधात पोटदुखी निर्माण करणारे आणि विषारी गुणधर्म असल्याचे समजण्यात येत असे, परंतु यात अलीकडे मौल्यवान ऍल्कलॉईडचे प्रमाण दिसून आले आहे. या ऍल्कलॉईडचे साम्य सर्पगंधा जातीच्या झाडाशी दाखवण्यात येते.
सदाफुलीच्या मुळांत ऍजमॅलिसिसन आणि सेरपेंटाइन सर्पगंधाच्या मुळापेक्षाही जास्त प्रमाणात आहे. यात रेसरपाइनपण आहे. त्यात दुखण्याचा त्रास कमी करण्याचा, रक्तदाब कमी करण्याचे गुणधर्म आहेत. प्राण्यांवर केलेल्या प्रयोगांनी असे दाखवून दिले आहे की सदाफुलीच्या ठराविक प्रकारच्या अर्काचा रक्तांच्या कर्करोगावर उपयोग होतो.
इतरजाती
(Cathrantahus pusilus, Locnera pusila) हे एक तण म्हणून उगवते व कमरेतील उसण किंवा कटिवातात उपयोगी असल्याचे सांगण्यात येते.
वेखंड
वर्णन
झाड लहान व लांब सुगंधी बहुशास्त्रीय जमिनीत वाढणाऱ्या खोडांनी युक्त (मूलस्तंभे); कणिसाचा अक्ष पानासारख्या महाछदाने झाकलेला; फुले लहान हिरवट, ५ ते १० से. मी. लांब, गोल कणिसात कणिशकास छदकणिश म्हणतात, फळे पिवळसर रंगाची.
वितरण
हे झाड भारतात समुद्रसपाटीपासून २०० मीटर उंचीच्या, मुख्यत: ओलसर व दलदलीच्या जागी सापडते किंवा हिमालयाच्या आग्नेय, ओलसर भागात सापडते. कर्नाटकात व भारताच्या इतर भागात याची लागवड करतात. ३ औषधी गुणधर्म असणाऱ्या या झाडाचे वाळवलेले मूलस्तंभ म्हणजे वेखंड होय आणि हे औषधात वापरतात.
वेखंडात बाष्पनशील तेल असल्याने ते वायूनाशी म्हणजे पोटांचे फुगणे आणि तत्सम वाटणे यावर गुणकारी आहे. वेखंडामुळे पचनशक्ति वाढ होते. वेखंड हे पोटदुखीवर घरगुती उपाय म्हणून प्रसिध्द आहे. यात असलेल्या बाष्पनशील तैलद्रव्यामुळे हे कफ पडण्यास मदत करते. वेखंडामुळे घशातील ग्रंथी वाहतात तसेच ते दम्यावर गुणकारी आहे. यात असलेल्या टॉनिक या द्रव्यामुळे तेसंग्रहणी, रक्ताचा अतिसार यावर उपयोगी आहे. वेखंड मोठया प्रमाणात घेतल्यास ते वांतीकारक म्हणून काम करते आणि मोठ्या प्रमाणावर वांत्या होतात. पाने आणि मूलस्तंभ सुगंधी पदार्थात, पेयात आणि कीटकनाशके तयार करण्यात वापरतात. मूलस्तंभातील तेल मज्जासंस्थेस उत्तेजित करणारे आहे.
अल्कोहोलमध्ये काढलेले तेलविरहित अर्क गुंगी आणणारे तसेच वेदनाशमन करणारे आहे. हे गुणधर्म वेखंडाची मानसिक रोगामध्ये उपयुक्तता सिध्द करतात. वेखंडाच्या मुळांची भुकटी कृमीउत्सर्जक असते.
मूलस्तंभाची जीवाणू विरोधी क्षमता सप्रयोग सिध्द झाली आहे. जवळ जवळ १.३ लाख रूपयाची २.८० क्विंटल्स मूलस्तंभ १९७५-७६ साली निर्यात करण्यात आले.