Print
Hits: 5374

प्रत्येकामध्ये प्रत्येक ठिकाणी उर्जेच्या ३ मूलभूत तत्वावर आयुर्वेद आधारीत आहे. हे तीन दोष असुन त्यांची नावे वात, कफ व पित्त ही आहेत. शरीराच्या मूळ जीवशास्त्राशी ही तत्वे जोडली जाउ शकतात. हे दोष त्या व्यक्तीची प्रकृती ठरवितात. शरीराच्या सर्व क्रीयांसाठी उर्जेची गरज असते मग ती क्रिया चयापचयाची किंवा पुननिर्माणाची असो. हालचालीसाठी ‘वात’ ही उर्जा, चयापाचयासाठी किंवा पचनासाठी पित्त ही उर्जा, शरीराच्या भागात स्निग्धता, स्थैर्य व वंगणाची शक्ती आहे. सर्व व्यक्तीमधे कफ, वात, पित्त हे गुणधर्म असतात, परंतू नेहमी यापैकी १ गूण प्राथमिक, २ रा दुय्यम व तिसरा हा कमी महत्त्वाचा असतो. आयुर्वेदात आजाराचे कारण कफ, वात, पित्ताची कमतरता किंवा अधिकता आणि याचा परिणाम म्हणून होणारा शरीरातील बिघाड. रोग हे शरीरात असणाऱ्या विषद्रव्यामुळेसुध्दा होण्याची शक्यता असते. ज्याला ‘आम’ असे म्हणतात.

आयुर्वेदानुसार व्यक्तीचे संतूलन, शरीर, मन आणि जाणीव यांच्या एकत्र कृतीमूळे राखले जाते. शरीर, मन आणि जाणीव यांचे संतूलन कसे राखले जाते हे जाणून घेण्यासाठी वात, कफ, पित्त यांचे एकत्रीत कार्य जाणून घेणे आवश्यक आहे. आयुर्वेदाच्या तत्वज्ञानानुसार संपूर्ण विश्वात उर्जेची देवाण घेवाण ५ महत्वाच्या घटकांपासून होते.

  1. पृथ्वी
  2. आप (पाणी)
  3. तेज (अग्नी)
  4. वायू (हवा)
  5. आकाश.

मानवी शरीरात ‘वात’ ही हालचाल करण्यासाठी लागणारी सूक्ष्म उर्जा तर ‘पित्त’ ही पचनासाठी लागणारी व शारीरिक स्थैर्य टिकवण्यासाठी ‘कफ’ ही उर्जा लागते.

हिंदू तत्वज्ञानानुसार या जगातील प्रत्येक गोष्ट ही ५ मूलभूत घटकांनी बनलेली असते ही गोष्ट आयुर्वेद स्वीकारते. या विश्वात बाहेर पडणारी प्रत्येक गोष्ट ही सूक्ष्म स्वरूपात आपल्या शरीरात असते म्हणून यां ५ तत्वांनुसार विश्व बनते. त्याच प्रमाणे आपले शरीर देखिल.

ही ५ तत्वे जीवनाचे मूलभूत घटक असून कोणतीही गोष्ट या ५ तत्वांच्या आधारे स्पष्ट करता येते उदा. घट्‌ट व स्थूल घटक हे पृथ्वी यामधे मोडतात, पाचन करणारी enzymes किंवा उष्णता निर्माण करणारे घटक हे ‘अग्नी’ मधे मोडतात आणि रिकामे भाग ‘आकाश’.

आयुर्वेदानुसार शरीर हे ३ मुख्य घटकांनी बनलेले आहे.

  1. त्रिदोष (तीन दोष)
  2. धातू (हे ७ आहेत)
  3. मल (त्याज्य पदार्थ मल, मूत्र, आणि घाम)

धातू हे मूलभूत पेशी असून ज्यामुळे शरीर सुदृढ ठेवता येते. धातू हे विविध अन्न घटकांच्या रसापासून तयार होतो, सुदृढ आरोग्यासाठी प्रत्येक धातूंची मात्रा आणि त्यांचे योग्य कार्य आवश्यक आहे.

‘मल’ हे शरीरातील चयापचय क्रियेमुळे निर्माण होणारा त्याज्य पदार्थ आहे. योग्य प्रमाणात मल उत्सर्जन हे आवश्यक आहे. जर तसे झाले नाही तर त्यामुळे विविध आजार निर्माण होण्याची शक्यता असते. हे सर्व घटक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या त्रिदोषांचे संतुलन राखण्याचे कार्य करीत असतात.