Print
Hits: 5526

आयुर्वेदाच्या पाठ्य पुस्तकात ‘रीज्यूव्हेनेशन’ (तारूण्य टिकविणे) यांस ‘रसायन’ असे म्हटले जाते. ‘रसायन’ ची आयुर्वेदात व्याख्या पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे, ‘रसायन म्हणजे जे वय कमी करते म्हणजे तारूण्य टिकविते व जून्या आजारांचा नाश करते.’ यामध्ये विशिष्ठ औषधे समाविष्ट आहेत उदा. च्यवनप्राश. आयुर्वेदानुसार Rejuvenation चा वापर सुदृढ/आरोग्यदायी होणे व दुसऱ्यांना मदत करण्यासाठी होतो.याचा वापर करून आपण आपली अध्यात्मिक ताकद वाढवून त्याचा वापर समाज, आजारी, गरीब दिनदुबळ्या लोकांसाठी करावा. ‘रसायन’ उपचार पध्दतीचे मुख्य उद्दीष्ट पेशीमधील enzymes चे कार्य संतुलित व कार्यप्रवणता टिकविण्यासाठी होतो. या उपचार पध्दतीने पेशींचे पुनरूज्जीवन केले जाते.

यामुळे मनाची शांतता टिकविण्यास तसेच अस्थींचे आरोग्य तसेच धमन्यांची मृदुता टिकविण्यास उपयोग होतो. यामुळे वृध्दत्वाची प्रक्रिया रोखली जाते आणि वाढत्या वयातदेखिल स्वतःला आजारांपासून दूर ठेवण्यास मदत होते.

उपचार सुरू करण्यापूर्वी खालील दोन मुद्दयांकडे लक्ष द्या.
पंचकर्मात सांगितलेल्या विशिष्ठ उपचाराने शरीरात चयापचय क्रियेमुळे निर्माण होणारे त्याज्य पदार्थ काढून टाकून शरीर आतून स्वच्छ केले जाते. शरीरातील विषारी (Toxins) काढून टाकल्यानंतर जर ‘रसायन’ हे उपचार घेतले तर उत्तम निकाल मिळतात. याशिवाय ही प्रक्रीया केली जाते.

‘रसायन’ उपचार घेणाऱ्या व्यक्तिस आरोग्यपूर्ण समाज निर्माण करण्यास, विचार, बोलण्यास व कार्य करण्यास शिकविले जाते. वास्तविक या घटकांना आयुर्वेदात फार महत्व दिले आहे.

रसायन उपचार पध्दती दोन प्रकारे दिली जाते.
कुटीप्रावेशिक (Kotipraveshika) उपचार
यामध्ये रसायन उपचार घेत असताना रूग्णाला दवाखान्यात रहावे लागते. विशिष्ठ प्रकारच्या झोपडीची/खोलीची व्यवस्था त्याच्यासाठी करावी लागते. डॉक्टरांनी सांगितलेला आहार व इतर पथ्यांचे रूग्णाला कसोशिने पालन करावे लागते. रसायन Rejuvenation घेण्यापूर्वी रूग्णाला पंचकर्म उपचार घ्यावा लागतो, आणि म्हणूनच व्यवसाय/नोकरी करणाऱ्यास ही पध्दती योग्य ठरू शकत नाही.

Vatatapik उपचार (Vaa-taa-ta-pi-ka) वातातपिक
ज्या व्यक्तिंना आयुर्वेदिक दवाखान्यामध्ये रहाण्यास वेळ नाही त्यांच्यासाठी ही उपचार पध्दती अत्यंत योग्य आहे. सामान्यतः रोजची कामे चालू ठेउन ही पध्दती वापरली जाउ शकते. डॉक्टरांनी सांगितलेल्या आयुर्वेदिक जडीबूटींचे रसायन/मिश्रण यात अंतर्भूत असते. ही औषधे सकाळी रिकाम्यापोटी घ्यायची असतात. पंचकर्म उपचाराशिवाय ही औषधे घेता येतात.