Print
Hits: 11661
Vaidya M. P. Nanal (Ayurved Foundation)

हा रक्ताने रक्तवाहिन्यांच्या चौरस एकक क्षेत्रफळावर निर्माण केलेला दाब होय उच्च रक्तदाब म्हणजे काय हे तंतोतंतपणे सांगणे अवघड आहे परंतु रोग्याचे वय व लिंग यांचा विचार करून सांगण्याचा प्रयत्‍न केला आहे.

वय रक्तदाब
२० १४०/९० मि. मी. पायाचा
४० १६०/९५ मि. मी. पायाचा
७५ १७०/१०५ मि. मी. पायाचा


वय वाढल्यावर वरील पातळ्याप्रमाणे दिसणारा रक्तदाब हा रूग्ण रक्तदाबाचा रोगी असल्याचे दर्शवितो लोकसंख्येच्या ७५ टक्क्यामध्ये १५ टक्के लोक उच्च रक्तदाबाने आजारी असतात असे आढळून आले आहे की उच्च रक्तदाबाचा विकार प्राधान्याने काळे, जपानी व मिठाचे अधिक सेवन करणारे यामध्ये आढळतो.

आयुर्वेदाच्या दृष्टीने रक्तदाब हा फक्त रक्तामुळे निर्माण होणारा प्रश्न नसून इतर रसांबरोबर संयुक्तपणे विचारात घेतला जातो कोणताही एक घटक रक्तदानास जबाबदार नसतो. आयुर्वेदाच्या मूळ सिध्दांताप्रमाणे सर्व १३ घटक - ३ दोष - ७ उती व ३ उत्सर्जित घटक या सर्वांचा एकत्रितपणे विचार करून रोगोपचार केले जातात.

उच्च रक्तदाब विषयक तक्रारीमध्ये आहारातील विविध घटक व रोग्याची मनोवृत्ती यांचा परिणाम होण्याची शक्यता असते.

आहार: मदिरा, मीठ, कडू, आम्ल मूळभाज्या, हिरव्या भाज्या, मासे यांचे अतिरिक्त सेवन
विहार: दिवास्वप्न, राग, अति परिश्रम
मन: राग, भाव, भावना
काल: शरद ऋतू

रक्तदाब नियंत्रणा मध्ये रेनल बॉडी फ्लूइड मधील मिठाचे महत्त्व..........

जेव्हा शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते तेव्हा ऍसमोलॅरिटी वाढते व त्यामुळे तहानेच्या ग्रंथी उत्तेजित होतात. व्यक्ती मिठाची तीव्रता नियमित करण्यासाठी अधिक पाणी पिते त्यामुळे पेशीबाह्य द्रवाचे प्रमाण वाढते.

पेशीबाह्य द्रवातील ऍसमोलॅरिटीतील वाढ त्यामुळे लहान मेंदू मधील पिट्यूटरी ग्रंथी उत्तेजित होऊन त्यातील पाझरणाऱ्या द्रवामध्ये वाढ होते. त्यामुळे ऍन्टीडाययुरेटिक हारमोन्स मोठया प्रमाणात स्त्रवले जातात या हारमोन्स मुळे मूत्रपिंडाद्वारे रेनल ट्यूब्यूलर प्लुइड मधून मोठया प्रमाणावर वाढलेल्या पाण्याचे शोषण करून मूत्र म्हणून बाहेर टाकले जाते अशा तऱ्हेने मूत्राचे प्रमाण कमी होऊन पेशीबाहय पदार्थ वाढतो.

शरीरातील थोडया प्रमाणात वाढलेले मीठ रक्तवाहिन्यावरील दाब मोठया प्रमाणात वाढविण्यास कारणीभूत होऊ शकतो. वाढलेला द्रव रक्तवाहिन्यावरील दाब कसा वाढवतो स्वनियंत्रणाचे कार्य