
मानसिक आरोग्याचा अभ्यास हा आयुर्वेदातील अष्टांगापैकी एक आहे अनेक ऐतिहासिक कारणामुळे हा अभ्यास देशभरातील थोडया घराण्यापुरता मर्यादित राहिला आहे व मुख्यत्वे मौखिक परंपरेने टिकून आहे.
कोणत्याही शारीरिक व्याधींच्या लक्षणावर नजर टाकल्यास ही लक्षणे पूर्णपणे शारीरिक नसल्याचे लक्षात येते. त्याचप्रमाणे मानसिक आजार मानल्या गेलेल्या व्याधींमध्ये अशी लक्षणे आढळतात की जी पूर्णपणे मानसिक नसतात ‘संपूर्ण शारीरिक वा मानसिक’ यांच्यातील सीमारेषा ही खरोखर अत्यंत अस्पष्ट आहे म्हणून शरीर व मन ही दोन्ही भिन्न असली तरी प्रत्येकाने हे समजले पाहिजे की दोन्ही एकमेकांना अभिन्नपणे जोडलेली असतात. सत्व, रज व तम हे मनाचे महत्वाचे गुणधर्म आहेत हे तिन्ही एकमेकांशी योग्य संतुलन राखून मन निरोगी राखतात सत्व हे ज्ञानसंपादन, वितरण व योग्यायोग्य विचार यास जबाबदार असते. रज हे पुढाकार घेणारे असून विचार निर्मितीस आवश्यक उत्तेजनाशक्ति पुरवते. तम हे त्याच्या प्रतिबंध करण्याच्या गुणधर्मामुळे शांतता व शमविणारा परिणाम देते व सर्वसाधारण परिस्थितीत रज व सत्व गुणांवर मर्यादा ठेवते.
मनाच्या निरोगी स्थितीसाठी या तीन तत्त्वांचा समतोल आवश्यक आहे. हा तोल पूर्णपणे ढळल्यास आपणास मानसिक असंतुलन येते. जर हा तोल कोणत्याही एका दिशेस ढळल्यास राग, चिंता, काळजी या सारख्या सामान्य भावना प्रबळपणे नजरेस येतात. आयुर्वेदात रोगप्रतिबंधावर अधिक भर देण्यात आला असून बरे करण्याच्या (गुणकारी) प्रक्रियेस दुय्यम महत्त्व आहे. त्यामुळे बरोबर वर्तणूक योग्य आहार नैसर्गिक भावना जपणे मानसशास्त्रीय वर्तणुकीवर संयम आणि दैनंदिन तसेच विविध ऋतुमानातील आहार नियमन या सर्वावर रोग प्रतिबंधासाठी भर देण्यात आला आहे.
या गोष्टी पाळण्यात केलेली तडजोड अथवा टाळाटाळ रोगवृध्दीस कारण होतात. मानसोपचार पध्दती पुढील तीन प्रकारात विभागण्यात आली आहे.
- दैवव्यपाश्रय
- सत्वावजय व
- युक्ती व्यपाश्रय
दैवव्यपाश्रया मध्ये मंत्रांचे पठण विविध प्रकारचे यज्ञ सुचविले असून त्यामध्ये विविध वनस्पतींचे तांदूळ, तूप, राळ यांचे बरोबर अग्नीमध्ये हवन केले जाते तसेच उपवास नियम (कठोर शुचिर्भूतता, योग्य आहार सेवन व विशिष्ट पदार्थाचा त्याग) प्रणिपात (विविध देवतांचे स्ववन) व प्रायश्चित्त या गोष्टी मनाच्या तामस व राजस वृत्तींवर अंकुश ठेवण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडतात, त्यामुळे सत्व गुणाचे प्राबल्य वाढते जे मनाच्या सामान्य व निरोगी वर्तणुकीस आवश्यक आहे. सत्वावजया मध्ये असंतुलित मनोव्यापारांवर यम (वर्तणुकीचे नियम) नियम (आहार विहाराची बंधने) आसने (मन व बुध्दीला स्थैर्य देणारी योगासने) प्राणायम (ज्यामुळे शरीरातील रोग निर्माण करणारे अडथळे दूर केले जातात) व ध्यान यांचा समावेश होतो.
युक्तिव्यपाश्रयामध्ये औषधे व आहाराचा न्याय्य वापर यांचा समावेश होतो. हे ढोबळमानाने दोन गटात विभागले आहेत
- शोधन व
- शमन