
प्रकृतीचे सर्वसाधारण गुणधर्म
आयुर्वेदिक वैद्याकडे सल्ल्यासाठी येणारी व्यक्ती त्याच्या/तिच्या प्रकृतीबद्दल जाणण्यास उत्सुक असते.
प्रकृती हे व्यक्तीचे शारीरिक, मानसिक संवेदना वाहक व आत्मिक गुणधर्म आहेत हे सर्व व्यक्तीच्या गर्भधारणा समयी निश्चित होतात. म्हणून रचना किंवा प्रकृती ही पूर्णपणे व्यक्तिगत बाब आहे. प्रकृती गर्भधारणेच्या वेळी ठरते. तिची वाढ गर्भाशयात होते म्हणून ती काहीशी उत्स्फूर्त काहीशा भावनिक गोष्टी तसेच प्रतिसाद दाखवते जे त्रिदोषांच्या एकत्रितपणावर व प्रभावावर अवलंबून असते.
एकूण ३ दोष असल्याने शारीरिक संरचना ७ ढोबळ गटात विभागता येते.
- एका दोषाचा प्रभाव (३) फक्त वात किंवा फक्त पित्त किंवा फक्त कफ
- तीन एकत्रित दोषांमध्ये दोन दोषांचा प्रभाव (३) वातपित्त, वातकफ, कफपित्त
- अतिशय आदर्श परंतु तितकेच दुर्मिळ एकत्रिकरण समधातु प्रकृती
अशाच प्रकारे मानसिक अवस्था १६ ढोबळ गटात विभागता येते. सत्वगुणाच्या प्रभावाने ७ रजोगुणाच्या प्रभावाने ६ व उरलेली ३ तमोगुणाच्या प्रभावामुळे. म्हणून कोणतीही व्यक्ती ७ पैकी एका शारीरिक व १६ पैकी एका मानसिक गटात मोडते परंतु हे मिश्रण खूपच व्यक्तिगत असेल.
आमचा असा प्रयत्न आहे की हे ज्ञान सर्वसामान्यांसमोर ठेवून आयुर्वेदाचा प्रसार करणे व जागरूकता निर्माण करणे व त्यांना त्यांची प्रकृती समजण्यास मदत करणे त्यांना शरीर व मनाची गुंतागुत समजावणे व त्यांची जीवनपध्दती सुधारण्यास मदत करणे त्यामुळे त्यांना आरोग्य व फलद्रूप, निरोगी, आनंदी, शांत जीवन लाभू शकेल.