Print
Hits: 7156
Vaidya M. P. Nanal (Ayurved Foundation)

तुलसी (हिंदी) अतिसार (मराठी)
आरोग्यसाथी आयुर्वेद (२ खंडात मराठी)
स्वास्थ व मालीश (मराठी)
Principles of Food & Nutrition (English)
अन्न व आहार यांचे तत्त्व
Manas Rogas in Ayurveda (English)

ज्यांनी मालीशचा वापर केला आहे. त्यांच्यासाठी वैद्य नानल यांचे हे पुस्तक अत्यावश्यक आहे.

आजच्या आधुनिक युगात बहुतेकांना कामावर जाण्यासाठी प्रवास करावा लागतो. यांत्रिकीकरणाचे जसे लाभ आहेत. तसेच तोटेही आहेत जसे प्रदूषण व त्याचे शरीरावर विशेषत: त्वचेवर होणारे परिणाम होतात हे माहिती आहे. परंतु बऱ्याच वेळा व्यावसायिक मालीश करण्याकडे जाणे शक्य नसते व म्हणून नोकरांकडून मालीश करून घेतले जाते हे पुस्तक त्यांच्यासाठी आहे. जे शास्त्रशुध्द मालीश घेऊ इच्छितात.

या पुस्तकात वि. नानल यांनी निरोगी म्हणजे काय? याचे विस्तृत विवेचन केले आहे. मालीशची सुरवात कशी झाली याची ऐतिहासिक पार्श्वभुमी सांगितली आहे. नंतर त्यांनी आपली त्वचा म्हणजे निश्‍चित काय? तिला कोणत्या प्रकारचे मालीश आवश्यक आहे. हे सांगितले आहे. मालीशसाठी वापरात असलेल्या वेगवेगळया तेलांचे गुणधर्म सुध्दा विस्ताराने सांगितले आहे. हे सांगितले आहेत. कोणत्या व्यक्तीला कोणत्या तेलाने व मालीशने फायदा होईल हे सांगितले आहे. व्यक्तीला फायदेशीर होईल अशाप्रकारे शास्त्रशुध्द मालीश कसे करावे हे सुध्दा विस्ताराने सांगितले आहे. शरीरावरील मालीश करण्याचे योग्य बिंदू रेखाचित्रद्वारे दाखविले आहेत तसेच योग्य प्रकारे मालीश कसे करावे हे सुध्दा काही प्रकाश चित्रांच्या मदतीने अंतर्भूत केले आहे.