चयापचय क्रिया व आहार जडीबुटीच्या औषधाद्वारे वाढविण्याची शुध्दीकरण प्रक्रिया म्हणजे पंचकर्म होय आणि अती जुनाट आजारामध्ये याचा वापर होतो. शब्दशः याचा अर्थ पंच म्हणजे कर्म कृती असा आहे. म्हणून पंचकर्म म्हणजे ५ प्रकारची तंत्रे किंवा उपचार होय.
पंचकर्म उपचार हे हेमीपोजिया, पोलियो, संधीवात, त्वचेचे आजार, डयूओडेनल अल्सर, अल्सेरटिव्ह कोलायटिस, आणि दमा यामध्ये खुप उपयोगी ठरतात.
पंचकर्मात वापरल्या जाणाऱ्या ५ उपचार पध्दती
१. वमन:
वांतिकारक औषधांचा वापर - कफ दोषामुळे होणाऱ्या तीव्र आजारामध्ये ही पध्दत वापरली जाते. यामध्ये नियंत्रित उलट्या - ओकाऱ्या औषधांच्या सहाय्याने निर्माण केल्या जातात. याचा वापर उपयोग जुनाट दमा, तीव्र पित्त, यामध्ये केला जातो. वमन हे लहान तसेच वृध्द किंवा गरोदर स्त्रीयांना देउ नये. तसेच ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली द्यावे.
२. विरेचन:
रेचकाचा वापर: पित्त दोषामुळे निर्माण होणाऱ्या तीव्र आजारामध्ये ही पध्दत वापरली जाते. काविळ, जंत व कृमी यामध्ये ही पध्दत वापरली जाते. लहान मुले, वृध्द किंवा गरोदर स्त्रीयांना विरेचन देउ नये. तसेच ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली द्यावे.
३. बस्ती:
औषधी - एनेमा - बस्ती - यात वापरली जाणारी औषधे ही काढा, शुध्द तेले, दुध इत्यादी असु शकतात. संधीवात, पाठदुखी इत्यादी मध्ये याचा वापर होतो. बस्ती ही लहान मुले, वृध्द, गरोदर स्त्रीया यांना देउ नये. तसेच ती डॉक्टरांच्या देखरेखीखाली द्यावी.
४. नस्य: नाकावाटे दिली जाणारी औषधे
नस्य हे नाकाद्वारे दिले जाते. औषधी चुर्ण, काढा किंवा तेलाचे थेंब हे नाकपुडितुन दिले जातात. ते डोके व मानेच्या भागातुन शिल्लक राहीलेले दोष व विषारी द्रव्ये काढुन टाकतात. मायग्रेन अपस्मार इत्यादी मध्ये नस्य वापरले जाते.
५. रक्त मोक्षनाः रक्त काढणे: दोन प्रकारे केले जाते
- शीर कापुन
- जळु लावुन
याचा मुख्यत्वे वापर, रक्तदोष व त्वचेचे आजार, हत्ती रोग इत्यादी मधे केला जातो. रक्त मोक्षन हे लहान मुले, वृध्द, गरोदर स्त्रीया यांना देउ नये. तसेच ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली द्यावे.
पंचकर्म उपचारात विशिष्ठ आहार पध्दती वापरली पाहीजे ज्यामध्ये खिचडी चा समावेश असावा