Print
Hits: 6294

आयुर्वेदानुसार निदान म्हणजे रोगाचे/आजाराचे मुळ कारण शोधुन काढणे होय. हे नेहमी गरजेचे नाही कि मूळ कारण हे नेहमी शरीरातच असले पाहीजे. रोगाचे कारण आजुबाजुला घडणाऱ्या घटना कुटुंबात किंवा कामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या घटना हे असते. कायम बरे वाटण्यासाठी मुळ कारण काढुन टाकले पाहिजे.

आयुर्वेदानुसार रोगावरिल उपचार म्हणजे त्याला शारीरीक लक्षणापासुन मुक्त करणे असा नाही. त्या व्यक्तीला सर्वोपचार दिले जातात. शरीर व मन रोगाचे मुळ शोधण्यासाठी वेगवेगळ्या परिक्षा घेतल्या जातात. त्यापैकी नाडीपरिक्षा ही एक आहे. नाडी बघुन आयुर्वेदिक वैद्य/डॉक्टर त्रिदोषाची स्थिती शोधुन काढु शकतो. जेव्हा वैद्याला समजते की कोणता दोष वाढला आहे किंवा कोणता दोष असंतुलित आहे. त्यावेळी ते दोष विविध उपचारांनी संतुलित करणे. हे प्रमुख कार्य असते. मानसिक परिस्थिती कौंटुंबिक नातेसंबंध आणि त्या शिवाय इतर घटकांची सुध्दा काळजीपुर्वक तपासणी केली जाते.

उपचार
उपचार हे ३ प्रकारे दिले जातात

औषधोपचारांमधे विविध नैसर्गिक वनौषधी, झाडे, आणि खनिंजापासुन बनविलेले चुर्ण, गोळ्या, काढा किंवा औषधी तेलांचा समावेश असतो. ही औषधे नैसर्गिक साधनापासुन तयार केलेली असतात. त्यामधे कृत्रिमता अजिबात नसते. त्यामुळे त्यांना शरीर लगेच स्विकारते व कोणतेही इफेक्ट्‌स निर्माण होत नाहीत फक्त ती योग्य प्रमाणात/मात्रेत दिली पाहिजेत.

औषधांबरोबरच योग्य आहार व योग्य जीवन शैली ठेवण्याचा सल्ला दिला जातो. रोगाचे मुळ कारण काढुन टाकण्यासाठी औषधे घेणे व कुपथ्य करणे यामूळे आजार बरा न होता वाढतच जातो. प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृती नुसार आयुर्वेदात आहार सुचविला जातो.

पंचकर्म उपचार म्हणजे शरीर आतुन पुर्णपणे स्वच्छ करणे. वेगवेगळ्या आजारामधे ही उपचार पध्दती वापरली जाते.

आपणास जाणवते कि निदान व उपचारांच्या पध्दती या साध्या आणि नैसर्गिक तत्वावर आधारित आहे. आयुर्वेद जगण्याचा पध्दतशीर व शास्त्रीय मार्ग दाखविते. संपुर्ण जगभर, चांगल्या आरोग्यासाठी रोंगांपासुन बचाव करण्यासाठी व दिर्घायुष्य मिळविण्यासाठी पंचकर्म ही उपचार पध्दती अगदी सुरक्षीतपणे सर्वजण वापरू शकतात.