Print
Hits: 12600

तमालपत्र (Taxus baccata)
वर्णन

Taxus baccata तमालपत्र

मीटर उंचीचे व १० मीटर परिघाचे, नेहमी हिरवेगार असलेले वृक्ष. फांद्या समांतर, टोकाचा भाग गोलाकार. नवीन फांद्या बारीक, करडया रंगाची लव असलेल्या आणि खालच्या बाजूस वळलेल्या.
पर्ण
२.५ ते ५ सेमी. लांब व .२५ सेमी. रूंद, चपटे, रेखाकार, ताजे असता हिरवे, वाळल्यावर पिवळे व चमकदार, टोकास वाकडे, कठीण आणि तीक्ष्ण शेंडा असलेले. वृक्षावर पाने ८ ते १० वर्षे टिकतात. फाद्यांना वेढून पाने फुटतात पण ती दोन रांगांमध्ये उगवल्याप्रमाणे भासतात.
फळ
१० ते १५ सेमी लंब गोलाकार, ४ ते ७ सेमी व्यासाचे निळया किंवा वांगी रंगाचे, वर्षाने पिकणारे. बीज १ ते २.५ सेमी लंब, पंखयुक्त. सिक्कीम, भूतान, कुमाऊँ, अफगाणिस्तान, बलुचिस्तान इ. हिमालयाच्या ३ ते ४ हजार फूट उंचीपर्यंतच्या प्रदेशात.
औषधी गुणधर्म
तीक्ष्ण, उष्ण, व सस्निग्ध असल्याने कफ नाहीसा करतो आणि मधुर अनुरस असल्याने वातघ्न राजयक्ष्मा व शोष या व्याधी बरे होण्यास मदत होते. अरूची, अजीर्ण, श्र्वास, कास, अतिसार, पण्डुरोग व संग्रहणीत तमालपत्राचे चूर्ण वापरावे. त्यात तमालपत्र १ भाग, मिरी २ भाग, सूंठ ३ भाग, पिंपळी व वंशलोचन प्र २ भाग, वेलची आणि दालचिनी प्रत्येकी अर्धाभाग आणि पिठीसाखार ३२ भाग आहे.

शतावरी (Asparagus racemosus)
वर्णन

Asparagus racemosus शतावरी

काटेरी झुपकेदार आरोहिणी वेल. फाद्यांवर उभ्या रेषांमुहे पन्हळी तयार होतात. काण्ड त्रिकोणी, स्निग्ध. कंटक ०.५ ते १ सेमी. लांब, खालच्या बाजूस वळलेले, काहीसे बाकदार.
पत्राभास काण्ड
ज्यांना शतावरीची पाने म्हणतात ते पत्राभास काण्ड होय. २ ते ६ संख्येच्या गुच्छात उगवणारे, १.२५ ते २.५ सेमी लांब, पातळ विळयाप्रमाणे भासणारे. पुष्पमंजिरी. २.५ ते ५ सेमी, लांब, एकेरी किंवा गुच्छस्वरूप त्यामध्ये लहान, सुगंधी पांढर किंवा गुलाबी फुले.
फळे
वाटाण्याच्या आकाराचे १ ते २ बीजांनी युक्त.
मूल
मूलस्तंभापासून जाड, लांबट गोल, दोन्हीकडे निमुळती व पांढरी अशी अनेक मूळे फुटतात. वर्षाऋतूच्या सुरूवातीला मृगनक्षत्र सुरू होण्याचे आसपास मुळांपासून नवीन शाखा फुटतात व त्यानंतर फुले व शरदात फळे येतात. भारतात सर्वत्र विशेष करून उत्तर भारतात.
औषधी गुणधर्म
शतावरी सिध्द वातव्याधीवर अभ्यंगासाठी वापरावे. देवी विकारांमध्ये दाहशामक म्हणून पानाचा लेप करतात. स्तन्यवृध्दीसाठी शतावरीच्या मुळया दुधात वाटून ध्यावा, दाहावर शतावरीचा काढा दूध आणि थोडा मध घालून द्यावा. ज्वरावर शतावरीच्या मुळांचा रस व गाईचे दूध एकत्र करून त्यात जिऱ्याची पूड घालून ते मिश्रण द्यावे. शरीरपुष्टतेसाठी शतावरी चूर्ण १० ग्रॅम प्रमाणात रोज दूधातून घ्यावे. आम्लपित्तावर २५ ग्रॅम मात्रेत शतावरीने सिध्द केलेले गाईचे तूप घ्यावे.