Print
Hits: 5485
Vaidya M. P. Nanal (Ayurved Foundation)

आयुर्वेद हे आरोग्याचा तीन स्तरांवर विचार करणारे पुरातन भारतीय शास्त्र आहे ते स्तर म्हणजे

आयुर्वेदतील विविध पदार्थांमध्ये सुरचित कार्यकारण भाव आहे. म्हणून आयुर्वेदास शास्त्र मानण्यास आवश्यक सर्व निकष पूर्ण होतात. आयुर्वेद हा शब्द आयु वेद या दोन शब्दापासून बनला आहे. आयु म्हणजे जीवन - जीवन अस्तित्वात येण्याचे सर्व संदर्भ म्हणजेच उद्‌भव, वाढ, आरोग्यस्थिती रोगी, अवस्था इ. आयुर्वेद म्हणजे वैद्याची आवश्यकता न भासता सकारात्मक आरोग्य राखणे.

यासाठी स्वास्थ्यव्रत नावाची विस्तृत जीवन पध्दती मांडण्यात आलेली आहे. एक आरोग्यदायी आहार पध्दती पुरस्कृत करण्यात आली असून तिचे पालन केल्यास जीवन निरोगी राहील. स्वास्थ्यव्रतात व्यक्तीचे वय, तिची शारीरिक रचना तसेच ऋतूंचा योग्य विचार केला आहे. व्यक्तिगतरीत्या काय केले म्हणजे सकारात्मक शारीरीक आरोग्य, मानसिक आरोग्य, ज्ञानेंद्रिय आरोग्य, आत्मिक आरोग्य आणि ही सर्व एकत्रित रित्या राखता येतील ह्यांचा विचार केला आहे. म्हणून आरोग्य ही आध्यात्मिक संकल्पना असून तिचा विभक्त विचार केलेला नाही.

इतर सर्व पुरातन भारतीय शास्त्रांप्रमाणे आयुर्वेदाला आध्यात्मिक संदर्भ आहे. आयुर्वेदिक तत्त्वज्ञानाची सांगड आत्म्याशी घातली आहे. स्पिरिट, सोल किंवा आत्मा अथवा देहभान हे आपल्या जीवनांचे साध्य आहे. हे नसल्यास तुम्ही अस्तित्वहीन होता व असल्यास ज्ञानार्जन स्वत:चा उत्कर्ष व नवीन भावनांचा अनुभव इ. मिळण्याची शक्यता आहे.

आयुर्वेदिक तत्त्वज्ञानाच्या साराची सांगड आत्मा अथवा व्यक्तिगत देहभानाशी घातलेली असून शरीररचना व शरीराची कार्य योजना तो आत असताना त्याच्या भोवती फिरते ही एक सुसंबध्द संरचना असून त्यात व्यक्तिगत शरीररचना कालाचा परिणाम, वयाचा परिणाम, आहार संपूर्ण कालखंडात असलेल्या सवयी यांचा विचार आहे ही आयुर्वेदाची जीवनकडे बघण्याची दृष्टी आहे.

वात, कफ व पित्ताची कार्ये.
वात, कफ व पित्त हे दोष म्हणून ऒळखले जातात. म्हणजेच ह्या शरीराच्या तीन मूलभूत प्रकृती आहेत त्या आयुर्वेदाच्या मूलभूत संकल्पना आहेत. प्रत्येकाच्या शरीरात त्या विशिष्ट प्रमाणात असतात. जर त्या तिन्ही संतुलित असतील तर व्यक्ती निरागी असते. संतुलन बिघडल्यास त्याचा परिणाम रोग होण्यात होतो.

वाताचे कार्य म्हणजे शरीराच्या एका भागातून एखादी गोष्ट दुसऱ्या भागात नेणे, कफ शरीराला जोडण्याचे एकत्र ठेवण्याचे कार्य करते. पित्ताचे कार्य संप्रेरकांचे पचन होय. या तिन्हीतील संतुलन म्हणजे आरोग्य. फिरणाऱ्या भोवऱ्याचे उदाहरण घ्या. जोपर्यंत त्याला गती असते तो पूर्णपणे उभा फिरतो यात व्यत्यय आल्याबरोबर तो कलू लागतो व त्याचा तोल जाऊ लागतो. हीच ती मार्ग भ्रष्टता तसेच शरीराची मार्गभ्रष्टता म्हणजेच रोग; ते शरीर फिरता फिरता स्वत:च्या जडत्वाने थांबले तर हे नैसर्गिक आहे याची तुलना नैसर्गिक मृत्यूशी करता येईल. हे सर्व प्रत्येकाच्या व्यक्तिगत क्षमतेवर अवलंबून असते. वातप्रधान व्यक्तीचा मृत्यू लवकर होतो. कफ प्रकृतीची व्यक्ती सर्वसाधारणत: दीर्घायुषी असते. व्यक्तीचे आरोग्य बघितल्यावर त्यांच्या जीवनाची स्थिती समजून घेता येते. मानसिक स्थिती समजते. त्याची आर्थिक स्थिती तसेच त्याच्या ज्ञानासंबंधी माहिती कळते. एक आयुर्वेदिक वैद्य या नात्याने विशिष्ट परिस्थितीत एखादी व्यक्ती कसा प्रतिसाद देईल हे मी सांगू शकतो. कोणाच्याही जीवनात तात्कालिक वात, कफ व पित्ताचा विचार करावाच लागतो प्रत्येक व्यक्तीची शरीररचना गर्भधारणेच्या वेळी निश्‍चित होते काही नियम पाळून त्यामध्ये रहावे. तुमच्या मर्यादा जाणा व तुमची बलस्थाने ऒळखा. तुमच्या बलस्थालाचा अधिकात अधिक वापर करा व तुमच्या दुर्बलस्थानांचे संरक्षण करा व निरोगी बना.