Print
Hits: 5724
Vaidya M. P. Nanal (Ayurved Foundation)

एच आय व्ही हा एक आधुनिक विकार आहे विषाणुचा शरीरात कोणत्या प्रकारे शिरकाव झालेला आहे याला महत्त्व आहे. जर रक्तावाटे शिरकाव झाला असेल तर वेगळी लक्षणे असतात. शरीर संबंधातून शिरकाव झाला असल्यास लक्षणे वेगळी असतात. संपर्क बिंदुमुळे फरक पडतो. हे पृथ्वीवर येणाऱ्या सूर्य किरणांप्रमाणे आहे.

पृथ्वीवर एकाच वेळी पोहोचणाऱ्या दोन किरणांपैकी एक विषुववृत्तावर व दुसरा उत्तर धृवावर पोहाचतो. त्याच्या प्रवासात ते वेगवेगळे अंतर काटतात व त्याप्रमाणे त्यांच्या तीव्रतेत फरक पडतो. विषुववृत्तांवर तो तीव्र व धृवावर तो अत्यंत मंद असतो म्हणून तो रक्तातून संक्रमित झाला असेल तर माझा लक्षणांचा अभ्यास वेगळा असेल व त्याप्रमाणे मी वेगळया पध्दतीने उपचार करेन जर तो शरीर संबंधातून आला असेल तर यात योनी संस्थेचा सहभाग असेल म्हणून मी वेगळा विचार करून वेगळी पध्दती अवलंबेन. जनकल्याण रक्तपेढीच्या सहयोगाने एच. आय. व्ही. रूग्णावर फक्त तीन वर्षापासून काम करत आहे. खात्रीने सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. रूग्ण वजनात वाढ दर्शवितात. प्रतिगमन दर्शवितात. आमचे तत्त्व असे आहे की रोग कोणताही असो व्हायरल विषाणूंसारखे अंतर्गत वा बाहय घटक शरीराच्या दोषिक सीमा ओलांडत नाहीत. लक्षण चिकित्सा दोशिक सीमांमध्ये समजण्यासारखी आहे एच. आय. व्ही. च्या रोग्यामध्ये सुध्दा अतिसार हा वातप्रकार, कफप्रकार वा पित्त प्रकारचाच आढळून येईल जैव रासायनिक घटक सुयोग्य बदल दर्शवित आहेत. क्लिनिकली ड्रॉप आउटस्‌ जवळ जवळ नाहीतच. एच. आय. व्ही. रूग्ण ही तरल संख्या आहे त्यांना आपली ओळख उघड होऊ नये असे सामाजिक कारणामुळे वाटते तरीही ते माझ्या उपचार पध्दतीला चिकटून आहेत कारण त्यांच्यात सुधारणा होत आहे वा त्यांना बरे वाटत आहे. तरीही कोणत्याही प्रकारचा दावा करणे मला रूचणार नाही कारण हे संशोधन अजून बाल्यावस्थेत आहे. संपर्कबिंदू हा विशिष्ट रोगात म्हत्त्वाचा आहे. त्याचा प्रभाव नंतरच्या उपचार पध्दतीवर आहे.