Print
Hits: 4868

आयुर्वेदाचा उगम हा जवळजवळ ५००० वर्षापूर्वी झाला आहे. मानव जाती एवढेच हे शास्त्र जुने आहे.

ईश्वरनिर्मित मनुष्य प्राण्याच्या कल्याणासाठी हे शास्त्र स्वर्गातुन पृथ्वीवर आले आहे असे मानतात. म्हणून हे शास्त्र चिरंजीव आहे. आयुर्वेदाच्या एका तत्वानुसार जसे जीवन हे शाश्वत आहे तसेच त्याचे शास्त्रही शाश्वतच असले पाहिजे.

आयुर्वेदाचे सनातनत्व हे चरक संहिते मधे विषद केले आहे. त्यामधे असे म्हटले आहे की आयुर्वेद हे सनातन आहे कारण त्याला सुरूवात नाही निसर्गातील नैसर्गिक तत्वावर आधारीत आहे.

इतिहास तज्ञांच्या मते आयुर्वेदाचे लिखाण सुमारे ५००० वर्षापुर्वी करण्यास सुरूवात झाली. सुरूवातीला आयुर्वेद हे तोंडी शिकवले व वापरले जायचे. हिंदु पुराणानुसार आयुर्वेदाचे ज्ञान हे ब्रम्हाने इंद्राला आणि इंद्राने भगिरथाकडे पृथ्वीवरील मानवकल्याणासाठी सोपिवले.