Print
Hits: 14002
Vaidya M. P. Nanal (Ayurved Foundation)

आयुर्वेदाला एक औषधी पध्दती म्हणून पुन्हा महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे, आणि डॉ. नानलांचे पुस्तक आयुर्वेदातील महत्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकते. त्यांनी आयुर्वेदाबद्दल ज्या दंतकथा आहेत त्या कशा खोट्या आहेत यापासून सुरूवात केली आहे आणि शास्त्रीयदृष्टया आयुर्वेद म्हणजे काय त्याचे विवेचन केले आहे.

या पुस्तकातील प्रत्येक अध्याय लोकांना सामान्यपणे होणाऱ्या विशिष्ठ तक्रारींवर आहे. अपचन, पोटदुखी, कोलायटीस - मोठया आतडयाचा दाह कावीळ आणि अशा अनेक रोगांवर या पुस्तकात लिहिले आहे. या पुस्तकात स्पष्टपणे लिहिले आहे की आहाराच्या वाईट सवयींमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतात यात डॉ. नानलांनी आपण कोणते अन्न खावे आणि कोणते टाळावे हे सांगितले आहे. परंतु हे पुन्हा व्यक्तिपरत्वे भिन्न असते कारण प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते. आरोग्याच्या प्रश्नांसाठी साधेसाधे उपायदेखिल दिले अहेत. घरगुती उपचार आणि योग्य आसर जोर दिला आहे.

शेवटचा अध्यायामध्ये त्यांनी आयुर्वेदाच्या औषधांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल लिहिले आहे. साधारणपणे लोकांमध्ये असा समज आहे की आयुर्वेदिक औषधांमुळे दुष्परिंणाम होत नाही त्यामुळे सल्ला न घेता स्वत: औषधे घेण्याकडे लोकांचा कल असतो. सगळया प्रकारची औषधे प्रत्येकाला लागू होत नाहीत. उदा. तुमचे डोके दुखत आहे ते सर्दीमुळे आहे की त्याचे आणखी काही वेगळे कारण आहे? उपचार करण्याआधी रोगाचे मूळ कारण शोधून काढणे आवश्यक आहे, आणि जे औषध एका प्रकारच्या डोकेदुखीवर चालू शकते ते दुसऱ्या प्रकारच्या डोकेदुखीवर चालेल असे नाही. म्हणून डॉ. नानल, ‘डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय औषधे घेऊ नका’ असा मोलाचा सल्ला देतात.