Print
Hits: 7406
Vaidya M. P. Nanal (Ayurved Foundation)

पेशींच्या पातळीवर बदल घडवून आणणारे घटक
कर्करोग- कॅन्सर ही एक स्थिती आहे, शरीरात वेगवेगळया पेशींची अमर्याद वाढ होणे. कर्करोग हा परिणाम झालेल्या पेशींचा परिपक्व होण्याचा काळ वेगवेगळा असतो. त्यांची अमर्याद वाढ होते. आयुर्वेदिक डॉक्टर असल्याच्या नात्याने माझ्या दृष्टिकोनातून मला माहिती आहे की कोणते घटक शरीरातील पेशींची अमर्याद वाढ थांबवतील, त्यांचा गुणकार थांबवून नाश करतील. तेव्हा मी जर यावर विचार केला तर एका विशिष्ठ व्यक्तीच्या स्थितीचा निष्कर्ष मी काढू शकेन.

आपण कर्करोग पूर्णपणे बरा करू शकत नाही पण अनेक स्थितीवर आपण नियंत्रण ठेवू शकतो ज्या विशेष घातक नसतात. अस्थी किंवा स्नायूंचा कर्करोग फार घातक असतो. त्यात आपण काही विशेष करू शकत नाहे. पण मज्जापेशी मधील कर्करोग, लसिंकपेशींचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग ही कर्करोगाची अशी स्थिती आहे ज्यात दिलेल्या उपचारांना चांगला प्रतिसाद मिळतो, जो रक्ताच्या कर्करोगात मिळत नाही. पण आयुर्वेदिक डॉक्टरने केलेले निदान हे कर्करोगांचेच असणे गरजेचे नाही. मी २४ वेगवेगळ्या स्थिती सांगू शकतो. यामध्ये कर्करोगाशी साधर्म्य असणारी लक्षणे आढळून येतात. माझ्याकडे ती व्यक्ती कर्करोगाचा रूग्ण म्हणून येते. मी त्याची तपासणी करून निदान करतो आणि माझ्या निदानाप्रमाणे उपचार करतो. यात वेगवेगळे दृष्टिकोन असतात आणि त्यामुळे निष्कर्ष देखील वेगवेगळे असतात, त्याचप्रमाणे हे दोन्ही निष्कर्ष तितकेच महत्त्वाचे किंवा वैध असतात. जरी या पध्दती वेगवेगळ्या असल्या तरी त्या एकमेकींना पूरक नसाव्यात असे नाही. म्हणून CML या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रक्ताच्या कर्करोगावर एखाद्या विशिष्ठ शास्त्रीय पध्दतीने उपचार करणे अशक्य असते पण दुसऱ्या पध्दतीने त्यावर उपचार करणे शक्य असते.

होमियोपॅथीमध्ये सुध्दा यावर काही सांगण्यासारखे असू शकते. कारण मानवाचे शरीर वेगवेगळ्या मार्गाने समजून घेता येण्यासारखे आहे. तुम्ही तुमच्या शरीराकडे जर एका विशिष्ठ दृष्टीकोनातून पाहिले तर तुम्ही वजन, शिथीलता, व्हाल्यूम हे बघता पण जर तुम्ही केमिस्ट अशाला तर तुमचा दृष्टीकोन वेगळा असेल आणि प्रत्येक जण आपआपल्या ठिकाणी बरोबर असतो. कारण या सगळयाची गोळाबेरीज खरी असते जर तुम्ही विभागणीच्या किंवा तुकडयाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर ते अयोग्य ठरते.

आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आपण पेशींची चयापचय क्रिया पाहू. ग्रहण केलेल्या अन्नाचे पचनाद्वारे तीन पातळ्यांवर रूपांतर होते ते सूक्ष्म स्थितीत होते. यामुळे ते दूषित पदार्थ विरहित असते. या घटकांचा ढीग जो हा बदल घडवून आणतो त्याला आहार परिणामकारक भव: असे म्हणतात. यातील प्रत्येकाची पचनक्रियेत एक नक्की भूमिका असते. यातील एकट्याचे किंवा एकत्रितपणे जर कार्य बिघडले तर त्याचा परिणाम अंतर्गत रोग होण्यात होतो. एकटयाचे किंवा एकत्रितपणे कार्य बिघडल्यास ते पचनाच्या कार्यात अडथळा आणतात त्यामुळे रस निर्माण न होता आम निर्माण होते. आम हा अतिविषारी, दाट, थंड आणि जड पदार्थ असतो.

हा पोषक नसून दूषित करणारा आणि बिघडणारा आहे. जडपणा आणि घनतेमुळे तो वात दाबून टाकतो, पित्त वाढवतो आणि दूषित कफ निर्माण करतो. जरी हा अन्ननलिकेतून सुटण्यात यशस्वी झाला तरी तो एखाद्या पेशीमध्ये किंवा अवयवाच्या पोकळीत शिरू शकत नाही. याप्रकारे तो पेशींना भ्रष्ट करतो जे त्याला पोषक असते, आणि अपचनामुळे त्रिदोषांमध्ये असमतोल निर्माण होतो.